Noida Construction Bulding Collapse News Saam Tv
देश विदेश

Noida News : निर्माणाधीन इमारतीत मोठी दुर्घटना; दोन कामगारांचा मृत्यू

Noida Construction Bulding Collapse News : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे शटरिंग कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे.

Alisha Khedekar

  • नोएडामध्ये शटरिंग कोसळून भीषण अपघात

  • तीन कामगार ढिगाऱ्याखाली गाढले गेले

  • उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू

  • सुरक्षेतील निष्काळजीपणा प्राथमिक तपासात उघड

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे शटरिंग अचानक कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३ कामगार ढिगाऱ्याखाली गाढले गेले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तीन कामगारांना वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना आज सकाळच्या सुमारास नोएडाच्या सेक्टर १४२ पोलिस स्टेशन हद्दीतील सेक्टर १४४ मध्ये ही घटना घडली. या परिसरात एका इमारतीचे काम सुरु होते. यादरम्यान इमारतीचे शटरिंग अचानक कोसळले आणि काम करत असलेले कामगार ढिगाऱ्याखाली गाढले गेले.

कामगारांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इतर कामगार आणि स्थानिक लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले आणि कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, जिथे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि एकाची प्रकृती गंभीर आहे.

मध्यवर्ती विभागाचे डीसीपी शक्ती मोहन अवस्थी म्हणाले की, घटनेची गांभीर्याने दखल घेत, इमारतीच्या बांधकाम ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यवेक्षक आणि कंत्राटदाराला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन दोषींना अटक केली आणि संबंधित कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. शिवाय या घटनेने कामगारांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरच्या मोहोळमध्ये धाब्यावर evm आढळून आल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने मागितला खुलासा

Jalgaon Tourism: जळगावपासून 284 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन; या विकेंडला नक्की प्लान करा

'त्या' दिवशी अजितदादांसोबत विमानात PA का नव्हता? खासदाराने व्यक्त केला संशय

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर तब्बल ९ दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे आणि कधी असणार रस्ता बंद?

ZP Election Result : मिनी विधानसभेवर कुणाचं राज्य? जिल्हा परिषदेचा फैसला काही तासात

SCROLL FOR NEXT