१ मार्चपासून सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅप्स चालणार नाहीत.
केंद्र सरकारने सिम-बाइंडिंग नियम सक्तीचा केला
बनावट नंबर आणि डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेतला
मोबाइलमध्ये संबंधित सिमकार्ड सक्रिय असेल तर व्हॉट्सअॅप चालणार
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालणार नाही. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले की, सिम-बाइंडिंग नियमात कोणताही बदल किंवा शिथिलता येणार नाही. हा नियम व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल मेसेजिंग अॅप्सला देखील लागू असणार आहे. त्याचा उद्देश डिजिटल सुरक्षा मजबूत करणे हा आहे. आता हा नियम १ मार्चपासून लागू होणार आहे आणि कंपन्यांना त्याचे पालन करावे लागणार आहे.
सरकारच्या मते, या सर्व अॅप्सना सक्रिय सिमकार्डशी सतत कनेक्ट राहावे लागणार आहे. जेणेकरून व्हॉट्सअॅपसाठी वापरलेला नंबर खरा आणि सक्रिय आहे की नाही हे कन्फर्म करता येईल. जर मोबाईलमधून सिमकार्ड काढून टाकला किंवा सिमकार्ड निष्क्रिय झाला तर त्या डिव्हाइसवर अॅपच्या सेवा काम करणार नाहीत.
ज्या सिमकार्डने तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार केले आहे ते सिमकार्ड तुमच्या फोनमध्ये सक्रिय असणे आवश्यक आहे. जर ते सिमकार्ड तुमच्या फोनमध्ये नसेल किंवा बंद असेल तर व्हॉट्सअॅप योग्यरित्या काम करणार नाही. आतापर्यंत असे होत होते की, एकदा तुम्ही ६ अंकी ओटीपी टाकून मेसेजिंग अॅप्समध्ये लॉग इन केले की सिमकार्ड आहे की नाही हे तपासले जात नव्हते. पण आता नवीन नियमामुळे बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. आता व्हॉट्सअॅप चालू ठेवण्यासाठी सिमकार्ड मोबाइलमध्ये सक्रिय असणे आवश्यक असणार आहे.
डिजिटल फसवणूक, बनावट नंबरचा गैरवापर आणि सायबर गुन्हे रोखण्यावर भर देत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालणार नाही हा नियम लागू झाल्यानंतर फसवणूक आणि बनावट अकाऊंट ओळखणे सोपं होईल. दूरसंचार विभागाने २८ नोव्हेंबर २०२५ ला सिम बाइंडिंग नियम जारी केला होता आणि कंपन्यांना तो पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. याचाच अर्थ असा की सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मला ९ मार्च २०२६ पर्यंत ही प्रणाली लागू करावी लागेल. जर तुमचा मोबाइल नंबर सक्रिय असेल आणि तुमच्या मोबाइलमध्ये तेच सिमकार्ड घातले असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याचे कारण नाही. तुमचे व्हॉट्सअॅप नेहमीप्रमाणे काम करत राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.