
आजच्या डिजिटल काळात मोबाईल नंबर हे तुमच्या ओळखीचे महत्त्वाची गोष्ट बनले आहे. बँक, आधार, सरकारी व इतर ऑनलाईन सेवांशी नंबर जोडल्यानं सुरक्षा वाढल्या आहेत. फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार ओळखीची चोरी करून नकली सिम जारी करतात. अनेकांना त्यांच्या नावावर किती नंबर आहेत याची जाणीवही नसते. आपली माहिती सुरक्षित ठेवा. सायबर फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने संचार साथी हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.
एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड?
भारत सरकारने एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड नोंदवता येतील याबाबत स्पष्ट नियम ठरवले आहेत; चला जाणून घेऊया ती मर्यादा आणि संबंधित नियम.
कायदेशीर कारवाईचा धोका
टेलिकॉम नियमांनुसार, प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ सिमकार्ड ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा अधिक सिमकार्ड ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा धोका संभवतो.
इतर देशातील नियम काय?
भारतभर नऊ सिमचा नियम लागू असला, तरी जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्य राज्यांत ही मर्यादा फक्त सहा आहे.
किती रुपयांचा दंड?
सिम मर्यादा ओलांडल्यास, पहिल्यांदा ५०,००० रुपये आणि पुन्हा गुन्हा केल्यास २ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
संचार साथी पोर्टल
तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे तपासण्यासाठी संचार साथी पोर्टलला भेट द्या आणि माहिती सहज जाणून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.