PM Modi on Manipur Saam TV
देश विदेश

PM Modi on Manipur : विरोधकांच्या सभात्यागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मणिपूरवर भाष्य, म्हणाले...

PM Modi in Lok Sabha : विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली.

प्रविण वाकचौरे

Pm Modi Speech : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर लोकसभेत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावर आपलं म्हणणं माडलं.

भाषण सुरु झाल्यानंतर दीड तास PM मोदी विरोधकांवर टीकास्त्र, सरकारची ९ वर्षातील कामगिरी यावर बोलत होते. मात्र विरोधक मणिपूरवर बोलण्याची सतत मागणी करत होते. अखेर संतापून दीड तासांनंतर विरोधकांनी सभात्याग करण्याची निर्णय घेतला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली.

मणिपूरबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, अमित शाह यांनी काल सभागृहात मणिपूर हिंसाचारावर सविस्तर माहिती दिली. मणिपूरच्या चर्चेपासून विरोधक पळत आहेत. लवकरच मणिपूरमध्ये शांतता प्रस्तापित होईल. देश मणिपूरच्या लोकांच्या, बहिणींच्या आणि मुलींच्या पाठीशी आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या चर्चेच्या निमंत्रणाला विरोधकांनी सहमती दिली असती तर दीर्घ चर्चा होऊ शकली असती. मणिपूरवर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी पत्र लिहिलं होतं. पण विरोधकांचा हेतू चर्चेचा नव्हता.

गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीची तपशीलवार माहिती दिली आहे. मात्र तरीही विरोधकांना राजकारणाशिवाय दुसरे काही दिसत नाही, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. (Latest Marathi News)

मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. घरं जाळली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहे. मात्र दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्तापित होईल, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास मोदींना मणिपूरवासियांना दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT