Nitish Kumar
Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

Bihar Political Crisis: बिहारमध्ये महाआघाडी-जेडीयू सरकारचा नवा फॉर्म्युला? राज्यपालांची मागितली वेळ

वृत्तसंस्था

पटना: बिहारच्या (Bihar) राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार (Nitish Kumar) आणि महाआघाडी यांच्यात पुन्हा एकदा युती झाली आहे. मात्र, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. दरम्यान, नव्या सरकारमध्ये नितीशकुमार किती महिने बिहारचे मुख्यमंत्री राहतील, याचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे.

महाआघाडी आणि जेडीयू यांच्यातील युतीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, नितीश कुमार पहिले आठ ते दहा महिने मुख्यमंत्री राहतील, त्यानंतर ते मुख्यमंत्रिपदाची कमान तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवतील अशी माहिती समोर येत आहे.

हे देखील पाहा -

सूत्रांवर विश्वास ठेवला तर सुरुवातीला जेडीयूचे नितीश कुमार मुख्यमंत्री असतील आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील. मात्र, आठ ते दहा महिन्यांनंतर नितीशकुमार मुख्यमंत्रिपद तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवतील.

याचे कारण नितीश कुमार आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या महाआघाडीच्या सरकारबाबत नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात करार निश्चित झाला असला तरी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (JD-U) आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्या नेतृत्वाखालील युती झाली आहे. काही वेळात त्याची अधिकृत घोषणाही होईल असे मानले जात आहे. दरम्यान, पाटणा येथील राजभवन येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

या 1 आणे मार्गावरील निवासस्थानी मुख्यमंत्री नितीश कुमार जेडीयूचे आमदार आणि खासदारांसोबत महत्त्वाची बैठक घेत आहेत. एवढेच नाही तर नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली असून लवकरच ते राज्यपाल यांची भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना राज्यपालांनी साडे बारा वाजता भेटीची वेळ दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: चार चाकी गाडीमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

SCROLL FOR NEXT