Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.
गाडीमध्ये असणाऱ्या वस्तूचा शुभ तसेच अशुभ प्रभाव होत असतो.
गाडीमध्ये लोखंडी धातू असल्याने लोहाचा संबंध राहू ग्रहांशी असतो.
यामुळे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी तुमच्या कारमध्ये ठेवल्या पाहिजेत.
गाडीमध्ये काही वस्तू ठेवल्याने नकारात्मकता कमी होते आणि अपघातही टाळता येतात.
कारमध्ये देवाचा फोटो किंवा मुर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होते.
कारमध्ये क्रिस्टल स्टोनही ठेवणे उत्तम मानले जाते. क्रिस्टल दगडांमध्ये नकारात्मकता दूर ठेवण्याची प्रचंड शक्ती असते.
वास्तुनुसार कारमध्ये काळा कासव ठेवणे शुभ मानले जाते. कारण यामुळे कारवर येणारे संकट आणि नकारात्मकता दूर राहते.
वास्तुनुसार, कारमध्ये मोरपिस ठेवणे शुभ मानले जाते. कारमध्ये मोरपिस ठेवल्याने गाडीत कोणतीही वाईट शक्ती असल्यास नष्ट होते.
वास्तुनुसार कारमध्ये एका छोट्या डब्बीमध्ये मीठ ठेवावे. यामुळे कारमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.