Tejashwi Yadav Saam TV
देश विदेश

Bihar Political Crisis: 'नितीश कुमार यांचा पक्ष 2024 मध्येच संपणार', बिहारमध्ये सरकार पडल्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया

Tejashwi Yadav News: नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आरजेडीची साथ सोडली आहे. भाजपसोबत जात ते आता 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Satish Kengar

Bihar Political Crisis:

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आरजेडीची साथ सोडली आहे. भाजपसोबत जात ते आता 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे, त्यांच्या एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे महाआघाडीतील पक्षांमध्ये फूट पडली आहे. आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना ते आयाराम, गयाराम आहे, असं म्हटलं आहे. आता त्यांचे सरकारमध्ये भागीदार असलेल्या तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी म्हणाले की, ते खूप थकलेले नेते आहेत. आम्ही त्यांना 17 महिन्यांत ऐतिहासिक काम करायला लावले. तेजस्वी यांनी जेडीयूबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे. नितीश कुमार यांचा पक्ष 2024 मध्येच संपेल, असं ते म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी मोठे पाऊल उचलले आणि महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एकदा एनडीएशी युती केली. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. दीड वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या महाआघाडीत काहीही चांगले होत नसल्याचे म्हणत नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. आमच्याकडे अनेक तक्रारी येत होत्या आणि त्या आम्ही स्वतः पाहत होतो. त्यामुळे आता या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.  (Latest Marathi News)

नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर तेजस्वी यादवही माध्यमांसमोर आले आहे. पत्रकारांशी संवाद साधत तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला. नितीश कुमार यांच्यावरही त्यांनी वैयक्तिक हल्ला चढवला. नितीश कुमार खूप दमलेले नेते आहेत, त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही, असे ते म्हणाले. आम्हीच 17 महिन्यांत ऐतिहासिक काम केले. त्यामुळे बिहारमध्ये एवढा विकास झाला आहे, जो पूर्वीच्या सरकारच्या काळात होऊ शकला नाही.

अयोध्येत राम, बिहारमध्ये पलटूराम : संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, हा त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम आहे, असं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT