Nitish Kumar Saam Digital
देश विदेश

Nitish Kumar : महिला आहेस, तुला काय कळतं, कुठून कुठून येतात! नितीश कुमारांची विधानसभेत पुन्हा जीभ घसरली, पाहा Video

Sandeep Gawade

बिहार विधासभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून नितीश कुमार यांनी सभागृहात महिला सदस्याला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून वादंग उठलं आहे. आरक्षणाचा ९ व्या प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी राजदच्या आमदार रेखा देवी यांनी केली. त्यावर नितीश कुमार चांगलेच भडकले. तु महिला आहेस, तुला काही कळत नाही, तुम्ही कुठून आलात, असं वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.

भागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी महाआघाडीच्या आमदारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला. मागासवर्गीय, अति मागास आणि दलित वर्गासाठी मागील वर्षी आरक्षणाची तरतूद वाढवली होती. या आरक्षणाच्या तरतुदीचा नवव्या अनुसूचीत समावेश करावा अशी विरोधांची मागणी होती, त्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. नितीश कुमार यांनी, राज्य सरकार यावर काम करत आहे, यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही लिहिल्याचं सांगितलं, मात्र तरीही विरोधक शांत झाले नाहीत. यावर नितीशकुमार चांगलेच संतापले.

नितीश कुमार यांना राग इतका अनावर झाला की त्यांनी आरजेडीच्या महिला आमदार आमदार रेखा देवी यांना फटकारल. 9व्या यादीत आरक्षणाचा समावेश करण्याची मागणी करणाऱ्या रेखा देवी यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तुम्ही महिला आहात, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही कुठून आलात, या लोकांनी काही केले आहे का? 2005 नंतर आपणच महिलांना प्रोत्साहन दिलं. मी आता बोलत आहे, त्यामुळे तुम्ही शांतपणे ऐका असंही ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार म्हणाले, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, त्यावर गदारोळ करण्यात अर्थ नाही. मात्र कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये पोहोचले. विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांनी त्यांना वारंवार त्यांच्या जागेवर जाऊन बोलण्याची विनंती केली, मात्र विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार उभे राहिले आणि म्हणाले, सरकारने जातीगणनेनंतर आरक्षणाची मर्यादा आधीच वाढवली आहे. पटणा उच्च न्यायालयाने यावर बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली आहे. नवव्या शेड्युलमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकारने केंद्र सरकारला पत्रही लिहिलं असल्याचं सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT