Lok Sabha Election  Saam tv
देश विदेश

Lok Sabha Election : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Lok Sabha Election update : लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची असणार आहे. दोन्ही नेते किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे. याचदरम्यान, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून प्रवास केला.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या. तर इंडिया आघाडीला २३१ जागा मिळाल्या. देशात सत्ता स्थापनेसाठी २७२ हा बहुमताचा आकडा आहे. सरकार स्थापन करण्यासाठी एनडीए आणि इंडिया आघाडीनेही हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू यांची किंगमेकरची भूमिका राहणार आहे. याचदरम्यान, दिल्लीला जाण्यासाठी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून प्रवास केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आज दोन्ही आघाड्यांनी आज दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं आहे. किंगमेकर होण्याची संधी असलेले नितीश कुमार यांच्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, बिहारमधून नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीसाठी विमानातून निघाले. त्याचवेळी तेजस्वी यादव देखील त्याच विमानातून दिल्लीला निघाले. यामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या संपर्कात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इंडिया आघाडी आघाडीकडून अखिलेश यादव यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली आहे. अखिलेश यादव आज चंद्रबाबू नायडू यांना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

इंडिया आघाडीकडून चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर सोपवण्यात आल्याची मिळत आहे. तर तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचं एनडीए आघाडीवर दबावतंत्र?

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए आघाडीवर दबावतंत्र निर्माण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा अध्यक्षपद दोन्ही पक्षांना हवी आहेत. तसेच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

हृदयद्रावक! ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा मृत्यू, प्रचाराच्या रणधुमाळीत आला हार्ट अटॅक

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

NHM Bharti: आरोग्य विभागात नोकरीची संधी; १९४७ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT