Nitin Gadkari In Parliament Winter Session x
देश विदेश

Nitin Gadkari: योग्य काम न करणाऱ्यांना बुलडोझर खाली देऊ; कंत्राटदारांना नितीन गडकरींचा दम, पाहा व्हिडिओ

Nitin Gadkari In Parliament Winter Session: दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात आढळून आलेल्या त्रुटींसाठी चार कंत्राटदारांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणालेत.

Bharat Jadhav

रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने न करणाऱ्या ठेकेदारांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सज्जड दम दिलाय. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कामात दोष ठेवणाऱ्या ठेकेदारांना त्यांना दम भरला. योग्य काम न करणाऱ्यांना थेट बुलडोझरच्या खाली टाकून देऊ, असा दम त्यांनी कंत्राटदारांना दिलाय.

लोकसभेच्या सभागृहात प्रश्न सत्रात राजस्थान नागौर येथील खासदार हनुमान बेनीवाल यांनी नितीन गडकरींना पुरवणी प्रश्न केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, कंत्राटदारांना मारून-झोडून नीट केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आमच्या विभागाने ५० लाख कोटी रुपयांचे काम केलं. आम्ही पारदर्शक, समयसुचकता, आणि परिणाम देणारे असल्याचं गडकरी उत्तर देताना म्हणाले.

'मला याचा उल्लेख करायचा नव्हता. ठेकेदाराने नीट काम केले नाही तर त्याला बुलडोझरखाली टाकू, लक्षात ठेवा, असे मी जाहीर सभेतही सांगितले आहे. यावर्षी सर्व कंत्राटदारांना मारून- झोडून नीट करेल. यावर कोणतीच तडजोड केली जाणार नाही.दिल्ली-मु्ंबईच्या एक्स्प्रेस वेमध्ये उणिवा दिसल्यानंतर चार- त्याबाबत ठेकेदारांना दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांच्याविरुद्धात कठोर कारवाई करण्यात येईल.

आयआयटी-खडगपूर आणि आयआयटी- गांधीनगरच्या तज्ज्ञांनी एक्स्प्रेसवेचं निरीक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यात उणिवा दिसून आल्या, अशी माहिती नितीन गडकरींनी पुरवणी प्रश्नोत्तरावेळी दिली. ‘आम्ही चार कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या असून त्यांना काळ्या यादीत टाकणार आहोत. कडक कारवाई केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असेही गडकरी म्हणाले.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे त्याचं बांधकाम सर्वात कमी वेळेत झालं आहे. रस्त्यांचे काम उशिराने झालं तर त्या अधिकाऱ्यांचे नाव सार्वजनिक केली जातील. जर आम्ही चांगल्या कामासाठी बक्षीस देत असतो. तर चुकीच्या कामासाठी वाईट कामांसाठी शिक्षा करणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. दरम्यान नितीन गडकरींनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना दम दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT