Nitin Gadkari  Saam Tv
देश विदेश

Nitin Gadkari: नितीन गडकरींना कुणी दिली PM पदाची ऑफर? दिल्लीच्या राजकारणात खळबळ

Nitin Gadkari On PM Post: नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? या चर्चेत आघाडी घेणाऱ्या नितीन गडकरींनीच पंतप्रधान पदाच्या ऑफरविषयी मोठा दावा केलाय. गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर कुणी दिली? त्यावर गडकरींची भूमिका काय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

नरेंद्र मोदीनंतर देशाच्या पंतप्रधान पदाविषयी चेहऱ्याची चर्चा सुरु झाली तर त्यात आघाडीवर असेललं नाव म्हणजे रोडमॅन नितीन गडकरी यांची नितीन गडकरींची क्लीन इमेज आणि त्यांच्या कामाचा झपाटा यामुळे गडकरींच्या नावाची चर्चा रंगत असते. मात्र आता खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच विरोधी पक्षाच्या नेत्यानं आपल्याला थेट पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केलाय. विशेष म्हणजे संजय राऊतांनीही गडकरींच्या दाव्याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम चेहरा म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे. नितीन गडकरींनीही आपल्या स्पष्टवक्तेपणातून नेतृत्वाला इशारे आणि कानपिचक्या दिल्यात. तरीही नितीन गडकरींचं मंत्रिमंडळातील स्थान कायम आहे. तर दुसरीकडे गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी वारंवार चर्चेत येतं. त्याची काय कारणं आहेत? पाहूयात.

गडकरींना कुणाची PM पदाची ऑफर?

नितीन गडकरींची क्लीन इमेज

सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध

स्पष्टवक्तेपणा आणि थेट नेतृत्वाशी पंगा घेण्याची हिंमत

प्रशासन, संघ आणि पक्षीय संघटनेवर पकड

2010-2013 या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम

सलग 10 वर्षे मोदी सरकारमध्ये रस्ते वाहतूक मंत्री म्हणून काम

2014 नंतर सबकुछ मोदी अशी परिस्थिती होती. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे भाजपला आघाडी सरकार चालवावं लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर गडकरींनी गौप्यस्फोट केलाय. गडकरींनी विरोधी पक्षाची ऑफर नाकारल्याचं म्हटलंय. यातून गडकरींची पक्षनिष्ठा पुन्हा एकदा स्पष्ट झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT