रस्ते अपघातातील जखमींना आता कॅशलेस मिळणार उपचार
अपघातानंतर 7 दिवसांत 1.5 लाख रुपयांपर्यंत मिळणार मोफत उपचार
ही योजना आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत बसत नाही
आर्थिक वर्ष 2025-26 साठी 272 कोटींची तरतूद करण्यात आलीये
देशभरात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. दररोज देशातील विविध भागांत होणाऱ्या रस्ते अपघातांत अनेक जणांचा बळी जातोय. अपघातात अनेक जण जखमी होत आहेत. देशातील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जातेय. आता या अपघातांतील जखमींना आता कॅशलेस उपचार मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कॅशलेस उपचार योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
रस्ता दुर्घटनेत जखमी झालेल्या कोणत्याही व्यक्तींना निवडक रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत दुर्घटना घडल्यानंतर ७ दिवसांच्या आत १.५ लाख रुपयांपर्यंत उपचार केले जातील.
रस्ते दुर्घटनेतील उपचार हे आयु्ष्मान भारत- पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत येत नाहीत. त्यामुळे विमा नसलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांमुळे झालेल्या अपघाताच्या प्रकरणात केंद्र सरकारकडून अर्थसाहाय्य दिलं जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान विमा नसलेल्या प्रकरणात योजनेअंतर्गत २७२ कोटींची तरतूद करण्यात आलीये.
नितीन गडकरींनी सांगितलं की, 'ही योजनेमुळे रस्ते दुर्घटनेत वेळेवर उपचार न मिळाल्याने होणारे मृत्यू कमी होतील. जखमींना वेळेत उपचार देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल'.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन मंत्र्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत रस्ते सुरक्षा, प्रवाशांसाठी योयी सुविधा, दळण वळण सारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत कॅशलेस उपचार मिळतील. या योजनेचा अनेकांना फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.