Union Minister Nitin Gadkari speaks on the future of fuel, advocating alternative energy solutions amid petrol-diesel debate. saam tv
देश विदेश

Petrol and Diesel Vehicles: पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद होणार? नितीन गडकरींच्या विधानानंतर चर्चांना उधाण

Nitin Gadkari Statement On Petrol And Diesel Vehicles: पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद होणार, याबाबत लोकांमध्ये चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे भविष्य नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.

Bharat Jadhav

  • नितीन गडकरींच्या विधानामुळे पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

  • पर्यायी इंधन आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्याचा संकेत

  • पेट्रोल-डिझेल गाड्या बंद होणार का यावर चर्चांना उधाण

अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. इंधन पुरवठा सुरळीत नसल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडली होती. इंधनाचा पुरवठा खंडीत झाल्याने देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानामुळे पेट्रोल-डिझेल इंधनाचे वाहने बंद होणार? या चर्चाला उधाण आले आहे.

पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या वाहनांचे भविष्य नाहीये, असे विधान केंद्रीय रस्ता वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नतीन गडकरींनी केले होते. त्यांच्या विधानानंतर वाहने बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात पर्यायी इंधनाच्या समर्थनात बोलताना पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत विधान केलं होतं.

ऑटोमोबाईल उद्योगाला इतर पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहने निर्माण करण्यास विनंती केली आहे. हा बदल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास योगदान देईल. गडकरींनी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बायोफ्युएल, सीएनजी आणि एलएनजी यांसारख्या पर्यायी आणि स्वच्छ इंधन पर्यायांकडे वळण्याची प्रक्रिया अधिक गतीने करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल आणि डिझेलमुळे आयात आणि पर्यावरणावरील परिणामांच्या बाबतीत गंभीर समस्या निर्माण होतात,असंही गडकरी यावेळी म्हणालेत.

हायड्रोजन हे भविष्याचे इंधन

सरकारने हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहतूक आणि कंपन्यांसाठी प्रायोगिक प्रकल्प आधीच सुरू केलेत. टाटा मोटर्स, व्होल्वो, अशोक लेलँड आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या प्रमुख भारतीय कंपन्या हायड्रोजन इंधनाच्या चाचण्यांमध्ये आधीच सहभागी झाल्या आहेत. आम्ही सध्या १० मार्गांवर हायड्रोजनवर चालणारे ट्रक आणि बस चालवत आहोत. हायड्रोजन हे भविष्याचे इंधन असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.

फ्लेक्स फ्युएलवर बोलताना गडकरी म्हणाले की, इथेनॉलचे एक महत्त्वाचे पर्यायी इंधन म्हणून महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारताकडे विविध प्रकारच्या कच्च्या मालापासून इथेनॉल उत्पादन करण्याची क्षमता आहे हे निदर्शनास आले आहे. त्यांनी सांगितले की, उद्योगक्षेत्र आधीपासूनच फ्लेक्स फ्युएल इंजिन विकसित करण्यावर काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटात होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Aadhaar Card Update : आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही!

Wednesday Horoscope: कोर्ट कचेरीच्या कामातून होणार सुटका, अचानक धनलाभाचा योग; जाणून घ्या तुमचं भविष्य

Skin care: रोजच्या कामामुळे स्किन केअरसाठी वेळ मिळत नाही? 5 मिनिटांत करा हे काम चेहरा होईल ग्लोईंग आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT