NIPAH virus Saam TV
देश विदेश

Nipah Virus Update : केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढला; ५ जिल्ह्यामध्ये अलर्ट, मास्क लावण्याच्या सूचना

Kerla Nipah News : राज्यातील स्थिती पाहता 7 ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

प्रविण वाकचौरे

Nipah VIrus News :

निपाह व्हायरसचं संकट केरळमध्ये वेगाने वाढत आहे. कोझिकोडमध्ये तर स्थिती चिंताजनक बनली आहे. निपाह व्हायरसचा फैलाव आणखी तीन जिल्ह्यांमध्ये झाला आहे. कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरममध्ये या पार्श्वभूवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील स्थिती पाहता 7 ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निपाह व्हायरसचा धोका लक्षात घेता कंटेनमेंट झोन भागात आणि रुग्णालयांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत.

आतापर्यंत कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केरळमध्ये आतापर्यंत निपाह व्हायरसचे ४ केस समोर आल्या आहेत, यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) चे पथक आज केरळ जाणार आहे. निपाह व्हायरसची तपासणीसह टीम कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये वटवाघळांचे सर्वेक्षणही करणार आहे. यापूर्वी 2018 आणि 2021 मध्येही कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता.

निपाह व्हायरसची लक्षणे

निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला ताप, डोकेदुखी, धाप लागणे, स्नायू दुखणे, उलट्या होणे, घसा खवखवणे अशी लक्षणे (Symptoms) दिसू लागतात. याशिवाय रुग्णाला चक्कर येणे, मूड बदलणे आणि न्यूरोलॉजिकल समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Param Sundari: सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम-सुंदरी' वादाच्या भोवऱ्यात, एका सीनमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी, वाचा नेमकं प्रकरण

GST: सर्वसामान्यांना दिलासा! १२ आणि २८ टक्के जीएसट रद्द होणार; या वस्तूंच्या किंमती होणार कमी

Mumbai Rain: मुंबई पावसाने ठप्प : सांताक्रूझमध्ये रस्ते पाण्याखाली, वाहनचालकांची मोठी तारांबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT