Tumakuru Road Accident , Karnataka , PM Modi , Accident saam tv
देश विदेश

Tumakuru Accident : कर्नाटकातील अपघातात तीन मुलांसह नऊ ठार, 11 जखमी; पंतप्रधानांनी केली मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्री माेदी यांनी घटनेबाबत दुख व्यक्त करुन मदत जाहीर केली आहे.

साम न्यूज नेटवर्क

Tumakuru Accident : कर्नाटक येथील तुमाकुरू जिल्ह्यात झालेल्या दाेन वाहनांच्या अपघातात नऊ जण ठार तर अकरा जण जखमी (injured) झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सिरा येथे हा अपघात झाला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्री माेदी यांनी घटनेबाबत दुख व्यक्त करुन मदत जाहीर केली आहे. (Tumakuru Accident Latest Marathi News)

तुमकुरू जिल्ह्यातील बालेनहल्लीच्या प्रवेशद्वारानजीक जीप आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण हाेती की घटनेत काही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. कर्नाटक पाेलिसांच्या माहितीनूसार या अपघातात रोजंदारीवर जाणा-या मजूरांचा मृत्यू झाला आहे. ते बंगळुरू येथे निघाले हाेते.

या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत. तसेच अकरा जण जखमी झाले आहेत अशी माहिती एसपी राहुलकुमार शाहपूरवाड यांनी दिली. त्यानी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा देखील घेतला.

या अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना दाेन लाख रुपयांची मदत. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र माेदींनी जाहीर केली आहे. त्याबाबतचे ट्विट माेदींनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT