Mumbai Pune Heavy Rain Warning
Mumbai Pune Heavy Rain Warning Saam Tv
देश विदेश

Weather Updates: मुंबई-पुण्यासाठी पुढचे २४ तास धोक्याचे; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: राज्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस (Heavy Rain) पडत आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपलं आहे. खासकरुन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे यांच्यासह मुंबई उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार बॅटींग केल्याने अनेक ठिकाणचे रस्ते हे जलमय झाले होते. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि पुण्यासाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत. या दोन्ही शहरात गेल्या. २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे हवामान खात्याने मुंबई आणि पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Mumbai Pune Heavy Rain News)

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टी अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे. त्यात गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रात विशेष करुन पुण्यात आणि मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे या दोन्ही शहरातील सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. तसेच, रस्ते जलमय होत, ते खचण्याची किंवा खड्डे पडण्याचा धोका हवामान खात्याने वर्तविला आहे. रस्ते निसरडे झाल्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच या काळात घाटमाथ्यासह बाधित क्षेत्रात जाण्याचे टाळावे, अशी सूचना भारतीय हवामान खात्याने केली आहे. पुणे शहरात दिवसभर संततधार कायम राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. पश्चिम महाराष्ट्रातील सततच्या पावसामुळे धरणांतील विसर्ग वाढविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT