Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Virar Crime News : विरारच्या पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमधील एका बारमध्ये तीन महिलांनी अश्लील शिवीगाळ करत पोलिसांना मारहाण करून चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Virar News
Virar NewsSaam Digital

विरारच्या पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमधील एका बारमध्ये तीन महिलांनी अश्लील शिवीगाळ करत पोलिसांना मारहाण करून चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तीनही महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमध्ये एका रेस्टॉरंट बारमध्ये 3 महिला दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर महिला पोलीस अंमलदार उत्कर्षा वंजारी, इतर पोलिस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले होते.

मात्र त्या महिलांनी पोलिसांशीही हुज्जत घालून शिवीगाळ करत दमदाटी केली. इतकंच नाही तर एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशाला पकडून ओढलं आणि धक्काबुक्कीही केली. पकडलेली कॉलर सोडवून घेत असताना महिलेने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला व कोपराला जोरात चावा घेतला आहे.

Virar News
Delhi News: दिल्ली पोलिसांची ७ राज्यात मोठी कारवाई; गोल्डी ब्रार टोळीच्या १० शार्प शूटर्सना अटक

दुसऱ्या महिलेने उत्कर्षा यांचे केस ओढले. पोलिस अंमलदार उत्कर्षा यांना सोडविण्यासाठी आलेल्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेल्या महिला सुरक्षा आकांक्षा भोईर हिलादेखील धक्काबुकी केली. तिसऱ्या महिलेने देखील त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली. यातल्या एका महिलेने पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यात,खांद्यावर लोखंडी बादलीने मारून दुखापत केली आणि हाताला मनगटाजवळ चावा घेऊन दुखापत केली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Virar News
Mumbai Crime: ४० वर्षांनंतर ७० व्या वर्षी दाऊदला पकडलं! १९८४ साली केलेल्या अक्षम्य 'पापा'चे घडे भरले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com