नाशिक: राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटींग (Heavy Rain) सुरू आहे. परतीच्या पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून ७ हजार ३८९ क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यंदाच्या मोसमात गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. (Godavari River Flood)
नाशिक जिल्ह्यातील नोदावरी नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत, तर अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. गंगापूर प्रमाणेच दारणा, कडवा, पालखेड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा, कादवा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवणार असल्याची माहीती प्रशानसनाने दिली आहे.
दरम्यान काल गुरुवारी मुंबईसह कोकणात बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरसह काही भागात, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला, अमरावती आदी भागांत हलक्या सरींची नोंद झाली. पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आदी जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.