NewsClick Raid Saam TV
देश विदेश

New Delhi: न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह दोघांना अटक; ४६ संशयितांची चौकशी, काय आहे प्रकरण?

New Delhi: 'न्यूजक्लिक' या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या पत्रकारांच्या घरी आज दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली.

Vishal Gangurde

New delhi:

'न्यूजक्लिक' या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या पत्रकारांच्या घरी आज दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली. 'न्यूजक्लिक'च्या संबंधित पत्रकारांच्या घरी मंगळवारी सकाळपासून असलेल्या सुरू असलेल्या छापेमारीनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

दिल्ली पोलिसांकडून मंगळवारी न्यूजक्लिक वेबसाइटचे मुख्यसंपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दोघांवर UAPA कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. आज दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकच्या संबंधित ३० जागांवर छापेमारी केली होती. त्यानंतर काही जणांना ताब्यात घेतले होते.

न्यूजक्लिक' या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या ३७ पत्रकारांची चौकशी करण्यात आली. तर ९ महिला संशयितांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या पत्रकारांचे लॅपटॉप, मोबाइलसहित इतर साधने जप्त केले आहेत.

काय आहे प्रकरण?

न्यूजक्लिक वृत्तसंस्थेचं नाव गेल्या महिन्यापासून चर्चेत आलंय. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर कारवाई केली होती.

ईडीकडून त्यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त करण्यात आला होता. त्यांच्यावर विदेशी निधीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. तीन वर्षांच्या कालावधीत ३८.०५ कोटी रुपयांची फसवणुकीचा आरोप आहे. न्यूजक्लिक वृत्तसंस्थेला चीनकडून निधी मिळत असल्याची आरोप आहे.

न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्याविरुद्ध UAPA अंतर्गत दाखल गुन्ह्यातील तपासात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीत पत्रकारांसह लेखकांच्या घरावरही छापेमारी झाली आहे. तसेच डिजीटल पुरावे आणि हार्डडिक्सही जप्त करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT