New Zealand Parliament Member Saam Tv
देश विदेश

New Zealand News: न्यूझीलंडच्या १७० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच २१ वर्षीय तरुणी झाली खासदार; संसदेतील तुफान भाषण VIRAL

New Zealand Parliament Member: न्यूझीलंडच्या १७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा २१ वर्षीय तरुणी खासदार झाली आहे. हाना रहिवाती मैपी क्लार्क (Hana-Rawhiti Maipi-Clarke)असे या तरुणीचे नाव आहे. हाना सध्या खूप जास्त चर्चेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Zealand Parliament Member Hana Rawhiti Maipi Clarke Speech

न्यूझीलंडच्या १७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा २१ वर्षीय तरुणी खासदार झाली आहे. हाना रहिवाती मैपी क्लार्क(Hana-Rawhiti Maipi-Clarke)असे या तरुणीचे नाव आहे. हाना सध्या खूप जास्त चर्चेत आहे. हाना रावहिती हिने संसदेत माओरी भाषेत भाषण केले आहे. या भाषणामुळेच ती चर्चेत आली आहे. हाना यांनी हे भाषण २०२३ मध्ये केले होते. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest News)

हाना यांनी मतदारांना आवाहन करत 'मी तुमच्यासाठी माझा जीव देऊ शकते... पण मी तुमच्यासाठी जिवंत राहीन'असे म्हटले आहे. हिनाचे हे भाषण जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरले आहे. हाना या न्यूझीलंडमधील माओरी जमातीचे प्रतिनिधित्व करतात.

हानाने आपल्या भाषणामध्ये नागरिकांना अनोखे वचन दिले आहे. 'मी तुमच्यासाठी जीव देऊ शकते. मात्र, तुमच्यासाठी मी जिवंत राहणार आहे. मी याआधी संसदेबाहेर जे भाषण केले होते ते माझ्या आजोबांना समर्पित करते. तर आजचे भाषण मी माझ्या मुलांना समर्पित करते', असे त्या म्हणाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडच्या एओटेरोआ येथून हाना खासदार झाली आहे. १८५३ नंतर सर्वात तरुण खासदार म्हणून हाना निवडून आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हाना संसदेत निवडून आल्या होत्या. ननय्या माहुता यांचा परभव करुन हाना यांनी ही निवडणूक जिंकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT