Corona News : कोरोनापासुन कधी मिळणार दिलासा? गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू

Corona Update : देशात दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण वाढतच आहेत. कोरोना विषाणूमुळं गेल्या २४ तासांत देशात १२ जणांचा मृत्यू झालाय.
Corona Virus India
Corona Virus India Saam Tv
Published On

Corona Virus In India

थंडीची चाहूल लागताच कोरोनाच्या (corona) रुग्णांमध्येही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. यामुळं पुन्हा नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय. JN.1 संक्रमित रुग्णसंख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रकरणं आढळून येत आहेत.

कोरोनाचा हा नवीन प्रकार 11 राज्यांमध्ये पसरला आहे. (latest corona update)

कोरोना रुग्णसंख्येत वाढ

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 761 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 334 वर पोहोचली आहे. कोरोनाचा उपप्रकार JN.1 च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 3 जानेवारीपर्यंत JN.1 चे 541 रुग्ण नोंदवले गेले आहेत.

केरळमध्ये JN.1 विषाणूची 148 रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत. याशिवाय गोव्यातून 47, गुजरातमधून 36, महाराष्ट्रात 32, दिल्लीतून 15, कर्नाटकातून 199, राजस्थानमधून 4, तेलंगणातून 2 आणि ओडिसात 1 रुग्ण आढळला आहे.

Corona Virus India
Corona News | दिवसभरात कोरोनाचे 171 नवे रुग्ण

आरोग्य यंत्रणा सतर्क

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दी करु नये असं आवाहन प्रशासन करतंय.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकराकडून खबरदारी घेण्यात आलीय. नागरिकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलंय. मास्क वापराबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हटले आहेत.

Corona Virus India
Corona Virus In India : नागरिकांमध्ये कोरोनाची पुन्हा भीती; गेल्या २४ तासांत आढळले ७०० हून अधिक रुग्ण, दोघांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com