Swati Maliwal On Rajya Sabha: स्वाती मालीवाल यांना केजरीवाल राज्यसभेवर पाठवणार, कोण आहेत स्वाती मालीवाल? जाणून घ्या

Swati Maliwal On Rajya Sabha News: आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Swati Maliwal On Rajya Sabha
Swati Maliwal On Rajya SabhaSaam Digital
Published On

Swati Maliwal On Rajya Sabha

आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला होणाऱ्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी आपने उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि एनडी गुप्ता यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर सुशील गुप्ता यांना यावेळी डावलण्यात आलं आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी आपचे ६२ आमदार आहेत. तर भाजपचे ८ आमदार आहेत. आमदारांच्या संख्येच्या आधारावर राज्यसभेच्या तीनही जागांवर आपचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान स्वाती मालीवाल यांची पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाची दखल पक्षाने घेतली आहे. स्वाती मालीवाल यांची आपच्या डॅशिंग नेत्या म्हणून देशभरात ओळख आहे.

अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी महिला आयोगाची जबाबदारी

स्वाती मालीवाल दिल्लीच्या राजकारणातील या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून २०१५ मध्ये अरविंद केजरीवाल यांच सरकार स्थापन झाल्यापासून त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. तितक्याच त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी महिला आयोगाची जबाबदारी स्वीकारली होती. कदाचित त्यावेळी स्वाती मालीवाल हे नाव राजकारणात नवीन होतं मात्र आज प्रत्येक दिल्लीकर त्यांना एक चांगल्या नेत्या म्हणून ओळखतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वात तरुण सदस्य

जनलोकपाल चळवळीसाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कोअर कमिटीच्या त्या सर्वात तरुण सदस्य होत्या, यावरू त्यांच्या राजकीय दर्जाचा अदांच येऊ शकतो. त्यावेळी या कमिटीत केवळ अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि किरण बेदी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. स्वाती मालीवाल या केजरीवाल यांच्या परिवर्तन या एनजीओ साठी काम करत होत्या. या दरम्यान दिल्लीतील सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि माहितीच्या अधिकाराबाबत लोकांना जागरूक करण्याचं कार केलं.

Swati Maliwal On Rajya Sabha
AAP Nominated Sanjay Singh Rajya Sabha: तुरुंगात असलेल्या संजय सिंग यांना 'आप' पुन्हा राज्यसभेवर पाठवणार, कोर्टाकडून ग्रीन सिग्नल

केजरीवाल यांचा विश्वास जिंकला

स्वाती मालीवाल यांचा जन्म १५ ऑक्टोबर 1984 मध्ये गाझियाबादमध्ये झाला. त्यांच सुरुवातीच शिक्षण वेगवेगळ्या शहरात झालं आहे. २००२ मध्ये त्यांनी एमटी स्कूल, नोएडातून इंटरमीडिएट केलं. त्यानंतर दिल्ली आयपी युनिव्हर्सिटीतून माहिती तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली. या दरम्यानच त्या पर्यावरण संवर्धणासाठी काम करणाऱ्या ग्रीनपीस या एनजीओशी जोडल्या गेल्या. त्यांच्यासोबत काम करू लागल्या. यानंतर परिवर्तन मध्ये काम करण्यास सुरुवात केली. परिवर्तनमध्ये काम करताना त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा विश्वास जिंकला आणि अण्णा हजारोंच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम आदमी पक्षात आल्या. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

Swati Maliwal On Rajya Sabha
Qatar Dahra Global Case: कतारमधील 8 माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com