New York Manhattan Shooting Saam Tv News
देश विदेश

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Manhattan office shooting: मॅनहॅटन परिसरातील ४४ मजली कार्यालयीन इमारतीत सोमवारी संध्याकाळी भीषण गोळीबार झाला. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात NYPDचा एक अधिकारी आहे.

Bhagyashree Kamble

  • न्यू यॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ४४ मजली इमारतीत गोळीबार; NYPD अधिकारी व ५ जण ठार

  • आरोपी शेन तामुरा याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली

  • एफबीआय आणि NYPDचा तपास सुरू; गुन्ह्याचं कारण अद्याप अस्पष्ट

  • शहर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन

सोमवारी सायंकाळी न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन परिसरात भीषण गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात न्यू यॉर्क पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ब्लॅकस्टोन आणि एनएफएलचे मुख्यालय असलेल्या ४४ मजली कार्यालयीन इमारतीत घडली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास शेन तामुरा नावाचा २७ वर्षीय तरूण इमारतीत घुसला. त्यानं रायफलनं अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. नंतर त्यानं स्वत:वरही गोळी झाडली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. बंदुकधारी आरोपी हा नेवाडा येथील लास वेगासचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

एनवायपीडी कमिशनर जेसिका डिश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितलं की, 'सध्या घटनास्थळातील परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे'. न्यू यॉर्क अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सोमावारी सायंकाळी भीषण गोळीबाराचा प्रकार घडला होता. पार्क अव्हेन्यूवरील या इमारतीतून कोणालातरी गोळी लागली आहे, अशी माहिती कुणीतरी कॉलद्वारे दिली.

नंतर विभागाच्या प्रवक्त्यानं या घटनेबाबत अधिकची माहिती दिली. घटनेनंतर संपूर्ण परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

महापौर अॅडम्स यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, न्यू यॉर्कर्स मिडटाऊनमध्ये सध्या या गोळीबाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कृपया सुरक्षित आणि योग्य खबरदारी घ्या. या परिसरात असाल तर, बाहेर पडू नका, असे आवाहन पोस्टद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्यानं स्वत:वर गोळी झाडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर, एफबीआय घटनास्थळी दाखल झाले आहेत. एफबीआयचे उपसंचालक डॅन बोंझिनो यांनी याबाबत एक्सवर माहिती शेअर केली आहे. 'सध्या आमची टीम घटनास्थळी सक्रीय झाली आहे. आरोपीचा अंदाधुंद गोळीबार करण्यामागाच हेतू काय होता? गुन्हेगार एकटा होता की त्याच्यासोबत आणखी कुणी होतं? तो कोणत्या नेटवर्कशी जोडलेला होता का? याचाही तपास सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT