New Year 2023
New Year 2023 ANI
देश विदेश

New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष?

साम टिव्ही ब्युरो

New Year 2023 News : भारतात नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही तास शिल्लक बाकी आहेत. मात्र, जगातील काही देशात नव्या वर्षाचा जल्लोष सुरू झाला आहे . जगातील सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात आधी नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. या देशानंतर इतर देशात नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. (Latest Marathi News)

जगात नववर्ष स्वागत करण्याचा दुसरा क्रमांक न्यूझीलँड देशाचा लागतो. यंदाही न्यूझीलँडने नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. शनिवारी न्यूझीलँडमधील नागिराकांनी जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं आहे. नागरिकांपासून लहान मुलेहीमध्ये नववर्षाचा जल्लोष करताना दिसत आहे.

३१ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार ३:३० वाजता सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात आधी नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. तर त्यानंतर ३:४५ वाजता न्यूझीलँडमध्ये नववर्ष साजरे केले जाते. न्यझीलँडनंतर ५:३० वाजता रशियातील छोट्या सात ठिकाणावर नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं.

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता ऑस्ट्रेलियाला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. तर साडे आठ वाजता जपान, दक्षिण कोरिया, साडे नऊ वाजता चीन, फिलीपीन्स आणि फिलीपीन्समध्ये नववर्षाचे स्वागत केले जाते.

रात्री ११ वाजता म्यानमार, साडे ११ वाजता बांग्लादेश आणि ११:४५ वाजता नेपाळला नववर्षाचं स्वागत केलं जातं. तर १२ वाजता भारत आणि श्रीलंकेत नव्या वर्षाचं स्वागत केले जाते. तर रात्री १ वाजता पाकिस्तानमध्ये नव्या वर्षाचं स्वागत केले जाते. तर अमेरिकेत एक जानेवारीला सकाळी ११:३० वाजता नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

Iran News: इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायकडून घातपात?

Explainer : दिग्गजांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद, राज्यातील 4 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचं करिअर घडणार? कुणाचं बिघडणार?

Chhaya Kadam : कान्स फेस्टिव्हलसाठी मराठमोळ्या छाया कदमचा हटके अंदाज

SCROLL FOR NEXT