Vande Bharat Express Saam Tv
देश विदेश

Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

Vande Bharat Express : बेंगळुरू ते गोवा दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. संभाव्य मार्ग, वेळापत्रक आणि प्रवासाचा कालावधी याबाबतची माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Bengaluru to Goa Vande Bharat route details : गोव्यासाठी आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. बेंगळुरू आणि गोवा या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. यशवंतपूर ते मडगाव हा प्रवास फक्त १३ तासात पूर्ण होणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने (SWR) याबाबत रेल्वे बोर्डाला अहवाल सादर केला आहे. सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावाला मंजूर केल्यानंतर या वंदे भारत एक्सप्रेसचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचा संभाव्य मार्ग अन् वेळ -

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग मंगळुरू रेल्वे झोनमधून जाणार आहे. बंगळुरूमधील यशवंतपूर स्टेशनहून वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६ वाजून ५ वाजता रवाना होईल. संध्याकाळी ७.१५ वाजता गोव्यातील मडगावमध्ये पोहचेल. तर गोव्यातील मडगावहून सकाळी साडेपाच वाजता रवाना होईल अन् सायंकाळी ६.४० वाजता यशवंतपूरमध्ये पोहचेल.  मंगळुरू जंक्शन आणि मंगळुरू सेंट्रेल स्टेशन मार्गे ही ट्रेन धावणार आहे.

वंदे भारतचा वेग वाढवण्याचा प्रस्ताव -

यशवंतपूर-मडगाव यादरम्यान सध्या वंदे भारत एक्सप्रेसला १३ तासांचा वेळ लागतो. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने काही विभागांवर गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रस्तावही दिला आहे. चिक्का बनावरा ते हसनया विभागात रेल्वेचा वेग ११० किमी/ताशी वरून १३० किमी/ताशी करण्याचा प्रस्ताव आहे. तर सकलेशपूर-सुब्रमण्य या घाट भागात वंदे भारतचा वेग ३० किमी/ताशी वरून ४० किमी/ताशी वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे.

रेल्वे बोर्डाची मंजूरी कधी मिळणार ?

एनडीटीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने नुकतीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर या नव्या वंदे भारत एक्सप्रेसच घोषणा केली. रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतचा औरचारिक प्रस्ताव मागवला होता. SWR अधिकाऱ्याने हा प्रस्ताव २० दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाला दिला.

रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून हा प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले. या मार्गावर सेवा चालवण्यासाठी दोन ट्रेनसेट (रॅक) आवश्यक असतील आणि दोन्ही रॅक उपलब्ध झाल्यानंतरच ती सुरू करता येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लाँच करण्याआधी होणार ट्रायल रन

बेंगळुरू आणि गोवा या दरम्यान यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याआधी या मार्गावर ट्रायल रन होणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेनुसार (SWR), या ट्रायल रनमध्ये स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग (AEB) प्रणालींनी सुसज्ज असलेल्या दोन वंदे भारत रॅकचा वापर केला जाणार आहे. विद्युतीकृत झालेल्या हसन-ठोकुर (मंगळुरू) विभागावरील ओव्हरहेड इलेक्ट्रिकल उपकरण (OHE) प्रणाली प्रमाणित आणि कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT