Maha Kumbh 2025 saam tv
देश विदेश

Maha Kumbh 2025: कुंभमेळ्यात डिजिटल स्नानाचा नवीन ट्रेंड! घरबसल्या 'एवढ्या' रुपयांमध्ये कुंभस्नान

Viral Video: महाकुंभ अंतिम टप्प्यात असून, भाविकांची वाढती गर्दी, तिकीट समस्या आणि लांब अंतरामुळे अनेकजण त्रासले आहेत. दरम्यान, 'डिजिटल स्नान'चा दावा करणारा एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dhanshri Shintre

महाकुंभ अंतिम टप्प्यात असून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रयागराजमध्ये पवित्र स्नानासाठी जाण्याची इच्छा असलेल्या भाविकांना प्रचंड गर्दी, ट्रेन तिकिटांच्या तुटवड्यामुळे आणि लांब पल्ल्याच्या चालण्यामुळे अडथळे येत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ‘डिजिटल स्नान’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. या व्हिडिओनुसार भाविकांना प्रत्यक्ष प्रयागराजला न जाता घरबसल्या कुंभस्नान करण्याची संधी मिळू शकते असा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर या अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओनुसार भक्तांनी आपले पासपोर्ट आकाराचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचे असतात त्यानंतर संबंधित व्यक्ती त्यांचे प्रिंटआउट काढून संगममध्ये प्रतीकात्मक स्नान करुन देतो. या सेवेचे शुल्क ११०० रुपये आहे. हा व्हिडिओ १९ फेब्रुवारी रोजी '@echo_vibes2' या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला. यात दीपक गोयल नावाचा व्यक्ती प्रयागराजचा असल्याचा दावा करतो आणि हातात छायाचित्रे घेऊन भाविकांना घरबसल्या कुंभस्नान करण्याची संधी देत असल्याचे सांगतो.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा श्रद्धेचा अवमान असल्याचे म्हटले तर काहींना शंका आहे की डिजिटल स्नानामुळे खरोखर आध्यात्मिक लाभ मिळतो का? अनेकांना हा प्रकार स्टार्टअपच्या नावाखाली पैसा कमविण्याचा मार्ग वाटला. एका यूजरने कमेंट केली की तुम्ही सनातन धर्माची खिल्ली उडवत आहात, याची लाज नाही का? यावर त्याने उत्तर देत दावा केला की त्यांच्या सेवेमुळे आतापर्यंत १२,००० लोकांना लाभ झाला आहे. या अनोख्या संकल्पनेवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे की भाविकांना प्रयागराजला न जाता गंगेत स्नानाचा लाभ मिळवता येईल. यासाठी ५०० रुपये देऊन आपला फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावा लागेल. त्यानंतर फोटो गंगेत विसर्जित केला जाईल आणि पुण्य तुमच्या खात्यात जमा होईल असा संदेश पोस्टरवर आहे. या अनोख्या दाव्यामुळे सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT