TOLL PLAZA : FASTag  AI Image
देश विदेश

New Toll Policy : फास्टॅग नाही, नो टेन्शन! टोलबाबत सरकार घेणार मोठा निर्णय

NETC FASTag : टोलबाबत नवं धोरण येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे टोलनाक्यांवर फास्टॅग नसेल तरी वाहनधारकांना टेन्शन घेण्याची गरज नाही.

Nandkumar Joshi

टोलसंदर्भात सरकारनं मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. देशातील राज्यमार्गांवर पथकर (Toll Tax) भरण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुढील १५ दिवसांच्या आतच टोल पॉलिसी आणणार आहे.

केंद्र सरकारनं टोलसंदर्भात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमार्गांवर टोल पेमेंटच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पुढील १५ दिवसांच्या आतच नवीन पथकर धोरण सादर करण्यात येणार आहे. मे पासून हे धोरण लागू होण्याची शक्यता आहे.

नवीन पथकर धोरण (Toll Policy) एकदा लागू झालं तर, कुणालाही तक्रार करण्याची संधी मिळणार नाही, असे संकेत नितीन गडकरींनी दिले आहेत. या नव्या धोरणानं फास्टॅगचीही गरज पडणार नाही, असे सांगण्यात येत आहे. गडकरींनी सांगितले की, नव्या यंत्रणेनुसार, प्रत्यक्ष टोलबूथचीही आवश्यकता भासणार नाही. त्याऐवजी सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि वाहनाच्या नंबर प्लेटवरून संबंधितांच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जातील.

जीपीएस टोलिंग सिस्टम कशी असेल? (GPS Based Tolling System)

देशातील रस्त्यांचे जाळे वाढत आहे. त्यामुळं सहाजिकच टोलनाके वाढत आहेत. सरकार आता त्यावर तोडगा काढणार आहे. जीपीएस टोलिंग सिस्टम आणण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे फास्टॅग सिस्टमची गरज भासणार नाही. टोलनाका उभारल्यामुळं खर्च वाढतो. त्यामुळं टोल पण वाढतो. या सगळ्या समस्या सोडवण्याच्या हेतूने सरकार नवी टोल सिस्टम आणण्याचा विचार करत आहे. या सिस्टमद्वारे जीपीएसच्या मदतीने ड्रायव्हर किंवा वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलची रक्कम कापली जाईल. नेमकं अंतर आणि वेळेच्या आधारे टोलची रक्कम ठरवली जाणार आहे.

मुंबई - गोवा महामार्गाबाबत अपडेट (Mumbai-Goa Highway Work Update)

गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. त्याबाबतही गडकरी यांनी माहिती दिली. यावर्षी जूनपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल. या महामार्गाबाबत अनेक अडथळे होते. पण या जूनपर्यंत रस्त्याचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

या महामार्गाचे काम एकदा पूर्ण झालं की, लागणारा वेळही कमी होईल. तसेच कोकण विभागाच्या विकासाला गती मिळेल. जमीन संपादन, कायदेशीर आव्हाने अशा विविध कारणांमुळं या महामार्गाच्या कामाला अनेक वर्षे लागली. विलंब झाला. आता हे सर्व मुद्दे निकाली निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामानं वेग पकडला आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT