India’s first 20-coach semi-high-speed train:  Saamtv
देश विदेश

New Delhi-Varanasi Vande Bharat Express: वाराणसी ते नवी दिल्ली, देशातील पहिली २० डब्यांची वंदे भारत ट्रेन; कसा असेल रुट? पाहा वेळापत्रक अन् तिकीटाचे दर

India’s first 20-coach semi-high-speed train: वीस डब्यांसह सुसज्ज अशी देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस बुधवार (ता. १८ सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. 20 डब्यांची वंदे भारत ही विशेष ट्रेन सोमवारी वाराणसी ते प्रयागराज आणि प्रयागराज ते वाराणसी दरम्यान चालवली जाईल

Gangappa Pujari

New Delhi-Varanasi Vande Bharat Express Shedule: भारतीय रेल्वेची पहिली 20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आजपासून (18 सप्टेंबर) वाराणसी जंक्शन ते नवी दिल्ली या मार्गावर धावणार आहे. वाराणसी ते प्रयागराज अशा दोन तिर्थक्षेत्रांना जोडणार असून प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर आता आजपासून ही ट्रेन नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

२० डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस..

वीस डब्यांसह सुसज्ज अशी देशातील पहिली सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस बुधवार (ता. १८ सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. 20 डब्यांची वंदे भारत ही विशेष ट्रेन सोमवारी वाराणसी ते प्रयागराज आणि प्रयागराज ते वाराणसी दरम्यान चालवली जाईल. सोमवारी संध्याकाळी 4.15 वाजता अहमदाबाद येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. खासदार प्रवीण पटेल आणि इतर लोकप्रतिनिधींनी यावेळी उपस्थित होते. सध्या 16 डब्यांची ही ट्रेन वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान धावत आहे. यामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून आता तब्बल वीस डब्यांसह भगव्या रंगातील ही आकर्षक ट्रेन 7 सप्टेंबरपासून नियमित धावण्यास सुरुवात होणार आहे.

प्रवास होणार सुसाट..

वाराणसी रेल्वे स्थानक हे देशातील प्रत्येक राज्यात प्रवासाचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. वाराणसीहून अनेक वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू आहे. ज्यात वाराणसी ते दिल्ली, पाटणा ते लखनौ, देवघर-झारखंड ते वाराणसी या दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे आणि ही सेमी हायस्पीड ट्रेन वाराणसी ते आग्रा असा प्रवास करते. अशा परिस्थितीत वाराणसी ते दिल्ली धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये आता 16 डब्यांच्या ऐवजी 20 डबे असतील, तसेच ही देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.

जाणून घ्या वेळापत्रक अन् तिकीट दर...

नवी दिल्ली-वाराणसी २० कोचच्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ट्रेन क्रमांक 22436/22435 आणि 22415/22416 समाविष्ट आहेत. या ट्रेन सुमारे ८तासात ७७१ किमी अंतर कापतात. ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. ट्रेन क्रमांक 22415 ही वाराणसीवरुन सहा वाजता नवी दिल्लीसाठी निघेल आणि 14:05 वाजता पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 22435 ही वाराणसीवरुन तीन वाजता नवी दिल्लीसाठी निघेल आणि रात्री ११:00 वाजता पोहोचेल. यावेळी ही ट्रेन प्रयागराज जंक्शन आणि कानपूर सेंट्रल या दोन स्थानकांवर थांबेल. २० डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एसी, नॉन एसीसह दोन आसन पर्यायांसह एकूण १४४० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये AC चेअरचे भाडे १७९५ रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्ह चेअरचे भाडे ३३२० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT