narendra modi stadium 
देश विदेश

नेटीझन्सने करुन दिली नरेंद्र माेदी स्टेडियमची आठवण, मग काय..!

Siddharth Latkar

मेजर ध्यानचंद हे हॉकीमधील सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखले जातात. सन १९२६ ते १९४९ या कालावधी त्यांनी हाॅकी खेळात आपले कसब सिद्ध केले. सन १९२८, १९३२ तसेच १९६३ कालावधीत त्यांनी ऑलिम्पिकमधून पदके खेचून आणली.

सातारा : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करीत असल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमन उधळली तर काहींनी त्यांच्यावर टीकेची झाेड उठवली. विरोधकांसह अनेक नेटीझन्सनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला narendra modi stadium नाव एका खेळाडूच्या नाव द्यावे अशी मागणी केली आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियम, जे मोटेरा स्टेडियम म्हणून प्रसिद्ध होते, त्याचे नाव बदलून नरेंद्र माेदी स्टेडियम करण्यात आले. माेदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हाेते. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.

गुजरातचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी पंतप्रधान मोदींकडून एक अपेक्षा व्यक्त केली आहे. ते लिहितात नरेंद्र माेदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केले आहे. मी त्यांना नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव पुन्हा सरदार पटेल स्टेडियम असे ठेवण्याची विनंती करताे.

क्रीडा पुरस्काराच्या नामांतराचे क्रिकेटपटू इरफान पठाण याने स्वागत केले आहे. याबराेबरच त्याने आशा आहे की भविष्यात खेळाच्या स्टेडियमची नावे खेळाडूंच्या नावावर असतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अखेर न्याय मिळाला असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराचे नाव देऊन केवळ भारतीय हॉकीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांच्या भावनांना न्याय दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव वाय सत्यकुमार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांना ही खरी श्रद्धांजली आहे.

पंतप्रधान मोदी नाव बदलण्याची वाईट परंपरा वाढवत आहेत असे काँग्रेस नेते पवन बन्सल यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, नरेंद्र मोदींनाच प्रत्येक गोष्टीचे श्रेय कसे घ्यायचे हे माहित आहे. जर नरेंद्र मोदींना मेजर ध्यानचंद यांच्या नावाने काही करायचे असते तर नवीन क्रीडा पुरस्कार जाहीर करता आला असता. हे सगळं याेग्य नाही.

हे केवळ मागणी पूर्ण करण्यासारखे नाही तर संपूर्ण क्रीडा जगताची आणि देशाची महान चेतना मेजर ध्यानचंद यांच्या नावाने प्रज्वलित करण्यासाठी आहे असे कुस्तीपटू याेगेशवर दत्तने नमूद केले आहे.

काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या आहेत.

खेळांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे नाव खेळाडू, लँडमार्क किंवा स्वातंत्र्यसैनिक यांच्या नावावर असावे असे युवा वर्गाची अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT