Nepal Flood update  Saam Tv
देश विदेश

Nepal Flood: '२० मिनिटांत पाणी पोहचेल ', नेपाळमध्ये पुन्हा महापूर येणार; ५ पट धोका वाढला, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Nepal Flood Warning: नेपाळमध्ये पूराचा धोका पाचपट वाढला. पुन्हा नेपाळमध्ये महापूर येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. नागरिकांना सुरळीत ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More
  • नेपाळमध्ये पुन्हा महापूर येण्याचा प्रशासनाकडून इशारा

  • नुवाकोटमध्ये पुढील २० मिनिटांत पुराचे पाणी येण्याची शक्यता

  • नेपाळच्या धुंडे बाजार परिसरात नागरिकांना स्थलांतराचे आदेश

  • नेपाळमध्ये पुराचा धोका पाच पट वाढला

नेपाळमध्ये महापूर आला आहे. या महापूरमुळे नेपाळचं मोठं नुकसान झालं आहे. मृतांचा आकडा ४५० वर पोहचला आहे. तर १००० पेक्षा जास्त जण बेपत्ता झाले आहेत. भारतामधील २९० पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत. महापूराच्या या विध्वंसातून सावरत नाही तोवर नेपाळमधील नागरिकांचे आणखी टेन्शन वाढले आहे.

नेपाळमध्ये पुन्हा महापूर येण्याचा इशारा दिला आहे. नुवाकोट जिल्ह्यावर हे महापूराचे संकट आहे. प्रशासनाकडून नागिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धंडे बाजार आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्याची पातळी वाढत चालली आहे त्यामुळे पुढच्या २० ते २५ मिनिटांत पुराचे पाणी या भागात येऊ शकते.

धुंडे बाजारमध्ये पोलिस आणि प्रशासकीय पथके नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करत आहेत. नागरिकांना त्यांची घरे आणि दुकाने रिकामी करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा वारंवार प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. याठिकाणी धोका वाढत असून कोणताही निष्काळजीपणा महागात पडू शकतो, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी रहिवाशांना दिला. संभाव्य पुराचे स्वरूप पूर्वीपेक्षा खूपच गंभीर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करणे गरजेचे आहे.

नुकत्याच आलेल्या भोटेकोशी-त्रिशुली पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी नुवाकोट एक होता. अनेक रस्ते आणि पूल आधीच पूरामुळे वाहून गेले आहेत. बचावकार्य सुरू आहे. आता आणकी एक महापूर येणार असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नेपाळच्या लष्कराने खबरदारीचा उपाय म्हणून दीड तासांसाठी बचावकार्य थांबवले आहे.

ज्या तलावाला पूर्वी फुटण्याचा धोका होता. त्यातील पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी खालच्या दिशेने जास्त प्रमाणात वाहत जात आहे. त्यामुळे बचाव पथकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. बचावकार्यात अडथळे येत आहेत. पोलिस आणि स्थानिक प्रशासन सध्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नदीच्या पाण्याच्या पातळीतील कोणताही बदल गांभीर्याने घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT