Nepal Flood  Saam Tv
देश विदेश

Nepal Flood: नेपाळमध्ये महापूरामुळे विध्वंस! ६१६ जणांचा मृत्यू, २५०० जण वाहून गेले; ३२० भारतीय बेपत्ता

Nepal Fllood Update: नेपाळमध्ये महापूराने हाहाकार केला आहे. या पुरामुळे आतापर्यंत ६१६ जणांचा मृत्यू तर २५०० जण बेपत्ता झाले आहेत.

Priya More
  • नेपाळमध्ये महापुरामुळे ६१६ जणांचा मृत्यू

  • नेपाळ पूरात २५०० हून अधिक नागरिक बेपत्ता

  • नेपाळ महापुरात ३२० भारतीय बेपत्ता

  • भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला पुन्हा पूराचा धोका

  • नेपाळमध्ये हिमनदी फुटल्याने महापुराचा तडाखा

नेपाळमध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत ६१६ जणांचा बळी घेतला आहे. तर २५०० पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत. पूरामध्ये वाहून गेलेल्यांमध्ये सैन्य, पोलिस आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे नेपाळमध्ये गेलेले ३२० भारतीय देखील बेपत्ता आहे. या सर्वांशी संपर्क करण्याचा भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. काही भारतीय नागरिकांशी संपर्क झाला असून त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे, तिबेटमध्ये अडकलेल्या ४०० भारतीयांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. महापूराचा फटका बसलेल्या भागामध्ये सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परिस्थिती सतत गंभीर होत असून पूराचे पाणी वाढत असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. भोटेकोशी नदीजवळ पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागल्यामुळे दुसऱ्यांदा पूर येण्याचा धोका वाढला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.

प्राथमिक तपासानुसार, एक हिमनदी फुटली आणि बर्फ, खडक आणि मातीचा ढिगारा खाली कोसळला. हा ढिगारा लेंडी नदीत पडल्याने तिचा प्रवाह तात्पुरता थांबला. जेव्हा हा नैसर्गिक अडथळा तुटला तेव्हा पाण्यासोबत चिखल, खडक आणि ढिगाऱ्यांचा एक प्रचंड प्रवाह नदीच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून गेला. या परिणामामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या काठावरील गावांचे मोठे नुकसान झाले ज्यामुळे अनेक वस्त्या, रस्ते, पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त झाले.

नेपाळमध्ये आलेल्या महापुरांनंतरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे बेपत्ता झालेल्यांना शोधून काढणे. डोंगराळ भागातील अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या प्रमणात अडचणी येत आहेत. या आपत्तीमुळे ९०,००० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरं वाहून गेल्यामुळे राहण्याचे हाल होत आहेत. पुराचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवरही झाला आहे. १३ जलविद्युत प्रकल्पांमधील अंदाजे ९३३ कामगार बेपत्ता झाल्याचे वृत्त होते, त्यापैकी २५४ जणांना वाचवण्यात आले आहे. इतर अनेक जण बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती आहे. एकट्या अप्पर त्रिशुली-१ प्रकल्पातील ५७६ कामगार अजूनही बेपत्ता आहेत.

नदीच्या मार्गात तयार झालेल्या तात्पुरत्या तलावामुळे निर्माण झालेला धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. सध्या नदीची पाणी पातळी सामान्य असली तरी देखील पाण्याच्या स्थितीवर आणि त्यावर साचलेल्या कचऱ्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम फक्त नेपाळवर झाला नाही तर सीमेपलीकडे चीनच्या तिबेटमध्येही झाला आहे. तिबेटमध्ये महापूराने हाहाकार माजवला. ग्यिरोंग काउंटीमधील पुरात ५ जणांचा मृत्यू झाला, तर २६० परदेशी नागरिकांसह अंदाजे ५५८ जण बेपत्ता आहेत. खवळलेल्या पाण्यामुळे गावे, वीज प्रकल्प, रस्ते, पूल आणि दळणवळण यंत्रणा यांचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : राजकारणात खळबळ! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही केली जाहीर

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

Sprouts Benefits: रोज सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स खा, शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे!

Calcium Rich Foods : दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देतात 'हे' ५ पदार्थ, हाडं बनतील लोखंडासारखी मजबूत

Gold Price Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त! ३ दिवसांत मोठी घसरण, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

SCROLL FOR NEXT