Nepal youth protests against Balen Shah saam tv
देश विदेश

नेपाळमध्ये पुन्हा तरुणांच्या आंदोलनाचा भडका! शाहांच्या राजीनाम्याची मागणी

Youth Demand PM Resignation: नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. तरुणांचे आंदोलन भडकले असून काही तरुणांनी आत्महत्या केली आहे अनेक प्रयत्न आणि विरोधी पक्षांकडून होणारी वाढती टीका यांमुळे ही अशांतता निर्माण झाली आहे.

Bharat Jadhav

  • बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

  • गेल्या तीन दिवसांत तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

  • काठमांडूमध्ये आंदोलन तीव्र झाले असून तरुणांमध्ये सरकारविरोधी नाराजी वाढत आहे.

नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. गेल्या तीन दिवसांत तीन जणांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीररित्या भाजला गेलाय. विशेष म्हणजे नव्यानं पंतप्रधान बनलेल्या बलेंद्र शाह यांच्याविरुद्धात आंदोलन केले जात असून तरुणांमध्ये त्याच्याविरुद्धात संतापाचा लाट उसळू लागली आहे.

इतकेच नाही तर बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तरुण आंदोलन करत आहेत, तर विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केलाय.

शाह यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप

झेन-जी नेपाळ संघटनेने पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप केला आहे. संघटनेच्या मतानुसार तरुणांचा रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्प आणि धोरणांमध्ये कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.२०२३ मध्ये प्रेम आचार्य यांनी केलेल्या आत्मदहनाची घटनाही चर्चेत आहेत. त्यावेळी काठमांडूचे महापौर असलेल्या बालेन शाह यांनी या घटनेला शासनाचे संपूर्ण अपयश म्हटलं होतं.

आता सध्याच्या घटनांवरील त्यांनी मौन पाळल्यानं ते विरोधी पक्ष आणि आंदोलकांच्या निशाण्यावर आले आहेत. नेपाळमधील या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तरुणांची मानसिकता, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. जर सरकारने लवकरच प्रभावी कारवाई केली नाही, तर आंदोलने अधिक तीव्र होऊ शकतात, असंही या संघटनेने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

Bath Routine: जापानी लोक सकाळी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करतात, जाणून घ्या यामागच्या ५ खास गोष्टी

Maharashtra News Live Update: शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Health Care: तुम्ही खाताय ते पनीर खरे की बनावट? 'या' सोप्या पद्धतीने करा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT