NEET paper leak investigation reveals a multi-state racket involving students, families, and coaching centres. Saam tv
देश विदेश

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Teacher’s Alert Uncovers Massive NEET Exam Leak Racket: NEET पेपरफुटीच्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होतायत... राजस्थानमधील बिवाल कुटुंबातील 3 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय... मात्र बिवाल कुटुंबातील 5 जणांनी 2025 मध्ये नीट परिक्षा पास केल्याच्या माहितीमुळे एकच खळबळ माजलीय...NEET चा पेपर कसा फुटला? याप्रकरणाची माहिती तपास यंत्रणांना कशी मिळाली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

२०१३ पासून सुरू झालेल्या नीट परिक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपरफुटीच्या ग्रहणानंतर संपूर्ण परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची वेळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर म्हणजे NTAवर आलीय..राजस्थानमधल्या सीकरपासून महाराष्ट्रातल्या नाशिकपर्यंत पसरलेल्या या घोटाळ्याचे धागेदोरे आता सीबीआयच्या तपासात उघड झाले आहेत. त्यामुळे NEETच्या पेपर नेमका कसा फुटला...

हरियाणाच्या गुरुग्राममधील BAMS चा विद्यार्थी यश यादव यांच्याकडे NEETची प्रश्नपत्रिका सर्वात पहिल्यांदा आल्याची माहिती समोर आलीय..याच यश यादवनं राजस्थानच्या जमवारामगढ येथील विकास बिवाल याला प्रश्नपत्रिका विकली...त्यानंतर विकास बिवाल यांने आपले वडील मांगीलाल आणि दिनेश बिवाल याला हा पेपर दिला...दिनेश बिवालनं मुलगा ऋषीला ही प्रश्नपत्रिका स्कॅन करून त्याची PDF फाईल तयार करून पाठवली...मग ऋषी आणि बिवाल कुटुंबीयांनी हीच प्रश्नपत्रिका पुढे सीकरमधील कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 लाखांना विकली...विशेष म्हणजे मांगीलाल बिवाल यांच्या कुटुंबातील 5 जण 2025 मध्ये नीट परिक्षा उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीय... त्यामुळे बिवाल कुटुंब NEET परिक्षेचा हा घोटाळा कधीपासून करतयं... याची चौकशी सुरु आहे..

दुसरीकडे पेपरफुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातही नाशिक, अहिल्यानगर, पुण्यापर्यंत पोहचले.. नाशिकच्या शुभम खैरनारनं हेच पेपर विद्यार्थ्यांना 15 लाखांना विकल्याचाही आरोप आहे... मात्र पेपरफुटीचा राजस्थानमधील एका शिक्षकाच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झालाय.

NEET पेपरफुटीचा पर्दाफाश

राजस्थानच्या सीकरमधील केमिस्ट्री विषय शिकवणाऱ्या शिक्षकाच्या घरमालकानं 3 मे रोजी नीट परिक्षा संपल्यानंतर व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या बनावट प्रश्नपत्रिकेचं पत्र शिक्षकाला दाखवलं...त्यावेळी शिक्षकाला केमिस्ट्री विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील 45 प्रश्न आणि व्हॉट्सअॅपमधील प्रश्नपत्रिकेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी बायोलॉजीच्या शिक्षक सहकाऱ्याला हा पेपर दाखवल्यावर बायोलॉजीचे 90 प्रश्न सारखे असल्याचं आढळलं. दोन्ही शिक्षकांनी सीकरमधील उद्योग नगर पोलीस ठाण्यात पुराव्यांसह लेखी तक्रार दिली. त्यानंतर 6 मेला शिक्षकांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या सचिवांना पुराव्यांसह ईमेलद्वारे तक्रार पाठवली...आणि NEET परिक्षेतील हा घोटाळा समोर आला....

पेपर फुटीतले मास्टरमाईंड बिवाल कुटुंबातील दिनेश बिवाल हा भाजपचा नेता असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जातेय... दिनेशचे भाजप नेत्यांसोबतचे वेगवेगळे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होतायत..त्यामुळे नीट पेपरफुटीच्या प्रकरणाचे राजकीय कनेक्शनचा तपास होणं ही गरजेचं असल्याचं बोललं जातयं.... मात्र यासगळ्या हरियाणाच्या यश यादवही ही नीटची प्रश्नपत्रिका कुठून आली... NTAमध्ये त्याचं कुणाशी साटंलोटं आहे का? पेपर प्रेस मधून फुटला की अधिकाऱांचाही यात हात आहे? हे शोधण्याचं मोठं आव्हान CBI पुढे आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT