ncp crisis Saam TV
देश विदेश

NCP vs NCP Crisis: 'अजित पवारांसोबतच्या आमदारांवर कारवाई करा'; ठाकरे गटानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही सुप्रीम कोर्टात धाव

NCP vs NCP Crisis: शरद पवार गटाने कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग स्वीकारत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

NCP Political News:

अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी पक्षावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने कायदेशीर लढाई लढण्याचा मार्ग स्वीकारत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांनी पक्षावर दावा केल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवारांसोबतच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करत शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, यासाठी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सूचना द्यावात, अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी

तत्पूर्वी, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही हजार कागदपत्रे आणि पतिज्ञापत्रे सादर केली आहेत. अजित पवार गटानंतर शरद पवार यांच्या पक्षानेही आठ ते ९ हजार कागदपत्रे आयागाकडे दिली आहेत.

तसेच आज पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत एकाच गटाला बाजू मांडायची वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. सायंकाळी ४ ते ६ या दोन तासांच्या कालावधीत एकाच गटाला म्हणणं मांडावं लागणार आहे. तर दुसऱ्या तारखेला दुसऱ्या गटाला म्हणणं मांडण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणत्या गटाला मिळणार, याबाबत सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Snake Fact: नाग आणि नागीणमध्ये फरक काय? कसा ओळखायचा?

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा, सोप्या पद्धतीने तयार करा मजेशीर स्नॅक

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

SCROLL FOR NEXT