Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Tv
देश विदेश

NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? उद्या होणार निवडणूक आयोगात सुनावणी

NCP Political Crisis: राष्ट्रवादीवरील दाव्याचं प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलं आहे. या प्रकरणावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

NCP Political Crisis:

अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यामुळे शरद पवार गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलं आहे. या प्रकरणावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत याबाबत उद्या गुरुवारी निवडणूक होणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता.

निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या सुनावणीमुळे अजित पवार गटाकडून पी.ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. यासोबतच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार केला होता. उद्या सुनावणीवेळी शरद पवार गटाचे वकील सिंघवी युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.

सुनावणी सलग होऊन फैसला होणार की पुन्हा नवी तारीख मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच शरद पवार गटाकडून ३० ऑक्टोबरला निवडणूक आयोगात मोठ्या प्रमाणात पुरावे सादर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: हे प्रभु ! एक्सीलेटरवरुन येण्याची नवीन पद्दत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Viral Video: नातवासाठी काहीपण! चिमुकल्याला हसवण्यासाठी आजोबांचा डान्स; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: बुलडाण्यात पोलिस व्हॅन आणि पिकअपची समोरासमोर धडक, २ पोलिसांसह तिघे गंभीर

Maharashtra Politics: निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकर यांचे मोठं संकेत

Mobile Tips: स्मार्टफोन चार्ज करताना 'ही' घ्या काळजी

SCROLL FOR NEXT