Sharad Pawar news  saam tv
देश विदेश

'संजय राऊत विरोधात लिहायचे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली'; शरद पवारांची भाजपवर टीका

केंद्रीय यंत्रणाच्या अटकसत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Vishal Gangurde

Sharad Pawar News : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. भाजप आणि शिंदे गट सत्तेवर येताच शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. तर काही आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर याआधी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे नेते देखील गजाआड आहेत. या केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, 'काही आठवड्यांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली. ते विरोधात लिहायचे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. जो राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता त्यांच्याविरोधात भाष्य करतो, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे'.

'अनिल देशमुख हे मागील राज्य सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यांना देखील अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर १०० कोटींचा आरोप करण्यात आला. शिक्षणासाठी १०० कोटी घेतले तरी त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली. त्यानंतर सदर रक्कम ही ४ कोटी झाली. आता सदर रक्कम १ कोटी झाली, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला.

शरद पवार पुढे म्हणाले, माजी मंत्री नवाब मलिक यांची काय चुकीचं केलं होतं ? २० वर्षांपूर्वी त्यांच्याकडून काही व्यवहार झाला होता. दुसरीकडे दिल्लीतील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर कारवाई होत आहे. चुकीचं काम केलं तर आमचं समर्थन नाही. मात्र, केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर करण्यात येत आहे.

केंद्रीय यंत्रणांना सोबत घेऊन देशात काम केलं जात आहे. आज देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजपजवळ आज बहुमत आहे. पण हे बहुमत उचित म्हणता येणार नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. मात्र, ज्या ठिकाणी सत्ता नव्हती, त्या ठिकाणी भाजपने सत्ता आणली आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती, पंरतु शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात भाजपची सत्ता आली आहे'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT