NCB ची गोव्यात मोठी कारवाई; दोन महिलांना अटक 25 किलो गांजा जप्त सुरज सावंत
देश विदेश

NCB ची गोव्यात मोठी कारवाई; दोन महिलांना अटक 25 किलो गांजा जप्त

गेल्या काही दिवसांपासून मुंबईबरोबरच देशात अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत.

सुरज सावंत

वृत्तसंस्था: गेल्या काही दिवसांपासून मुंबईबरोबरच देशात अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसाअगोदरच मुंबई एनसीबीने कोल्हापुरात एका फार्म हाऊसवर छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबई (mumbai ) एनसीबीने गोव्यात एक मोठी कारवाई (mumbai ncb) केली आहे.

हे देखील पहा-

मुंबई आणि गोवा एनसीबीने (Goa NCB) काल संयुक्तपणे उत्तर गोव्यातील (Goa ) अर्पोरा याठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी २ महिलांना अटक केली आहे. (arrested) यांच्याकडून जवळपास २५ किलो गांजा आणि MDMA च्या काही गोळ्या जप्त केले (MDMA tablets) आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये एक महिला विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोघींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (court) दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घटनेचा पुढील तपास मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी संयुक्तपणे करत आहेत. आरोपी महिल्यांच्या चौकशीमध्ये अमली पदार्थाचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदेशी महिला कोणत्या देशाची आहे? याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT