Navjot Singh Sidhu Resignation Saam Tv News
देश विदेश

" मॅडम मी राजीनामा देतो..."; पंजाबमधील पराभवानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा !

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आज पक्षाच्या पंजाब युनिटच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आज पक्षाच्या पंजाब युनिटच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सिद्धू यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मंगळवारी मोठी कारवाई केली आणि पाच राज्यांच्या पक्षाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले.

अमृतसर पूर्व मतदारसंघात आप उमेदवार जीवनज्योत कौर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर 6 दिवसांनी त्यांचा राजीनामा आला आहे. “ काँग्रेस अध्यक्षांच्या इच्छेनुसार मी माझा राजीनामा पाठवला आहे,” असे सिद्धू यांनी एका ओळीत राजीनामा पत्र पोस्ट करताना ट्विटमध्ये म्हटले आहे.

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यची घोषणा;

काँग्रेस अध्यक्ष गांधी यांच्या या सूचनेनंतर काही वेळातच उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश गोदियाल (Ganesh Godiyal) आणि उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू (Ajay Kumar Lallu) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पंजाबमध्ये काँग्रेसला आम आदमी पक्षाकडून (AAP) दारूण पराभव पत्करावा लागला आणि त्यांना केवळ 18 जागा मिळाल्या. तर सिद्धू स्वत: अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक हरले.

हे देखील पहा-

हायकमांडने राजीनामा मागितला होता;

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाबाबत पक्षश्रेष्ठींनी रविवारी बैठक बोलावली होती. तेव्हापासून सातत्याने कारवाईची फेरी सुरू झाली आहे. या क्रमाने सोनिया गांधी यांनी या राज्यांतील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचे राजीनामे (Resignations) मागितले होते. या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये संघटनेच्या पुनर्रचनेसाठी पीसीसी अध्यक्षांना त्यांची पदे त्वरित सोडण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT