Sri Lanka Power Cut Saam Tv
देश विदेश

Sri Lanka Power Cut: श्रीलंकेत बत्ती गुल! संपूर्ण देश अंधारात, नेमकं कारण काय?

Sri Lanka News: श्रीलंकेत पुन्हा एकदा विजेचे संकट गंभीर झाल्याची बातमी समोर आली आहे. जवळपास संपूर्ण देशात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Satish Kengar

Sri Lanka Power Cut:

श्रीलंकेत पुन्हा एकदा विजेचे संकट गंभीर झाल्याची बातमी समोर आली आहे. जवळपास संपूर्ण देशात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या बातम्या येत आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, सिस्टम बिघाडामुळे, जवळजवळ संपूर्ण श्रीलंकेची वीज गेली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सीईबीचे प्रवक्ते नोएल प्रियंथा यांनी सांगितले की, देशात वीज पुरवठा करणारे सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड (सीईबी) वीज पूर्ववत करण्याचे काम करत आहे. दरम्यान, सीईबीने सांगितले की, मेन लाइन ब्रेकमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि शक्य तितक्या लवकर वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ष 2022 मध्येही श्रीलंकेतील नागरिकांना 10 तासांच्या वीज कपातीला सामोरे जावे लागले आणि आर्थिक संकटात वाढ झाली. यामुळे बाजारपेठेत गोंधळ उडाला. त्यानंतर वीज नियामकाने दहा लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना इंधन वाचवण्यासाठी घरून काम करण्याचे आवाहन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला इंधन शिपमेंटसाठी पैसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे विजेचेही मोठे संकट निर्माण झाले आहे.  (Latest Marathi News)

श्रीलंकेच्या सार्वजनिक उपयोगिता आयोगाचे अध्यक्ष जनक रत्नायके यांनी सांगितले होते की, "आम्ही सरकारला विनंती केली आहे की सार्वजनिक क्षेत्रातील, ज्यात अंदाजे 13 लाख कर्मचारी आहेत, त्यांना पुढील दोन दिवस घरातून काम करण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून आम्ही इंधन आणि विजेची उपलब्धता सुनिश्चित करू शकू.''

दरम्यान, श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय चलनाचा साठा 70 टक्क्यांनी घसरला आहे. यासोबतच श्रीलंकेला अन्न आणि इंधनासह जीवनावश्यक वस्तू आयात करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पहिला कल मविआच्या बाजूने

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT