राष्ट्राने कायद्याचा आदर केला पाहिजे, हिंसाचाराचा नाही - अमरुल्लाह सालेह Saam Tv News
देश विदेश

राष्ट्राने कायद्याचा आदर केला पाहिजे, हिंसाचाराचा नाही - अमरुल्लाह सालेह

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपतींनी देशातून पळ काढला. मात्र अफगाणिस्तानचे उप राष्ट्रपती अमरुल्लह सालेह यांनी देश न सोडता तालिबानला आव्हान दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल शहरावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आलं. आपला पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. मात्र अफगाणिस्तानचे उप राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी देश न सोडता तालिबान विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढू असं जाहीर केलं. १७ ऑगस्टला त्यांनी स्वतःला देशाचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून जाहीर केलं आहे. (Nations must respect the rule of law, not violence - Amrullah Saleh)

हे देखील पहा -

उप राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे देशातच असून ते अफगाणिस्तानच्या पंजशीर या प्रांतात आहेत. तालिबानला या प्रांतात अजूनही विजय मिळवता आलेला नाही. या प्रांतातून तालिबानला तीव्र विरोध होत आहे. अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी अफगाण जनतेला धीर देत दहशतवादी संघटनेपुढे गुडघे न टेकण्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे त्यांनी पाकिस्तानलाही चांगलंच धारेवर धरलंय. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलंय.

आपल्या ट्विटमध्ये सालेह म्हणतात की, ''राष्ट्रांनी कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, हिंसाचाराचा नाही. अफगाणिस्तान पाकिस्तानला गिळण्यासाठी खूप मोठा आहे आणि तालिबांना राज्य करण्यासाठी खूप मोठा आहे. तुमच्या इतिहासाला अपमान आणि दहशतवादी गटांसमोर झुकण्याचा अध्याय होऊ देऊ नका.'' असं ट्विट करत त्यांना तालिबान आणि पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

SCROLL FOR NEXT