पंढरपूर : अफगाणिस्तानवरAfghanistan तालिबान्यांनीTaliban वर्चस्व मिळवल्या नंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातीलSolapur केळी निर्यातीवरBanana export झाला आहे. ऑगस्ट- सप्टेंबर अफगाणिस्तानात होणारी 15 कन्टेनर केळी निर्यातीचे करारAgreement रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.The impact of conflict in Afghanistan To banana growers in Solapur district!
हे देखील पहा-
भारतIndia आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये अनेक आर्थिक व्यवहार अवलंबून होते भारताने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक देखील अफगाणिस्थान मध्ये केली आहे मात्र नुकतीच अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेल्या मुळे भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
ऐन सणासुदीच्या काळात अफगाणिस्तानातून येणारी ड्रायफ्रुटसDryfoods बंद झाल्यामुळे त्यांची दरवाढ होणार आहेच मात्र भारतातून निर्यातहोणारा मालही तिकडे आयात होणं बंद झाल्यामुळे दर वर्षी किमान 30 टक्के केळी अफगाणिस्तान निर्यात होत होती ती आता बंद झाल्याने केळी निर्यातदार आणि उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.
आधीच कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत असतानाच अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे केळी उत्पादकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनामूळे मागील काळात केळी उत्पादक शेतकर्याना वाहतूक बंदीचा मोठा बसला होता. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर केळी दरात तेजी निर्माण झाली आहे. परंतु अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वानंतर निर्यात थांबली आहे.
जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तान हा ईराण नंतरचा सर्वात मोठा भारतातून केळी आयातदार देश आहे.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.