स्थायी समिती अध्यक्षांविरोंधातील आरोपांची शहानिशा करण्यासाठी भाजपकडून 'या' आमदाराची नियुक्ती

काल लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत धाड टाकत सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना अटक केली होती.
स्थायी समिती अध्यक्षांविरोंधातील आरोपांची शहानिशा करण्यासाठी भाजपकडून 'या' आमदारांची नियुक्ती
स्थायी समिती अध्यक्षांविरोंधातील आरोपांची शहानिशा करण्यासाठी भाजपकडून 'या' आमदारांची नियुक्तीSaamTV
Published On

पुणे : काल लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी  पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत धाड टाकत सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना अटक केली आणि एकच खळबळ उडाली होती या प्रकरणावरुण विरोधकांनी भाजपला चांगलेच धारेवरती धरले होते.याच पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्षांविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्याच आल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.BJP appoints MLAs to probe allegations against Standing Committee Chairman

हे देखील पहा-

तसेच पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत असल्याचेही पाटील यांनी म्हंटले आहे.मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

माधुरीताई उद्या पिंपरी-चिंचवडला जाणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले आहे. सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

स्थायी समिती अध्यक्षांविरोंधातील आरोपांची शहानिशा करण्यासाठी भाजपकडून 'या' आमदारांची नियुक्ती
जनतेला प्रश्न पडला आहे; भाजप नेत्यांना कशासाठी आशिर्वाद द्यायचा- बाळासाहेब थोरात

तसेच आम्ही चुकीला पाठीशी घालणार नाही, विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा  त्यांच्या सरकार मध्ये काय गोंधळ चाललाय, अधिकारी किती भ्रष्ट आहेत आणि कारभार कसा करतायेत त्याकडे बघावं अशी प्रतिक्रिया भाजपचे पक्ष नेते नामदेव ढाके यांनीही दिली आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com