गांधी जयंती: नथुराम गोडसे ट्विटरवर ट्रेंड; कॉंग्रेसनं केली कारवाईची मागणी Saam Tv News
देश विदेश

गांधी जयंती: नथुराम गोडसे ट्विटरवर ट्रेंड; कॉंग्रेसनं केली कारवाईची मागणी

ट्विटरवर आज गांधीजींबाबत आक्षेपार्ह मजकूर पसरवला जात आहे. फोटो एडिट करुन फेक पोस्ट, फेक न्यूज आणि प्रक्षोभक मीम्स शेयर केले जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज २ ऑक्टोबर रोजी गांधीजींची १५२ वी जयंती (Gandhi Jayanti) साजरी होत आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी गांधीजींना अभिवादनपर संदेश देत त्यांना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावरही गांधी नावाचे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मात्र दुधात मीठाचा खडा पडावा त्याप्रमाणे या आनंदोत्सवात विघ्न आलाय. गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे (Nathuram Godse) हा देखील ट्विटरवर ट्रेंड होत आहे. गांधीजींच्या जयंतीदिनीच त्यांचा मारेकरी असलेला नथुराम गोडसे ट्रेंड (Nathuram Godse Trending On Twitter) होत असल्यानं कॉंग्रेसने याला आक्षेप घेतलाय. (Nathuram Godse trends on Twitter on Gandhi Jayanti day; Congress demands action)

हे देखील पहा -

कॉंग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी याबाबत आक्षेप घेतलाय. ''आजच्या दिवशी देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ ट्विटरवर चालवण्यात आलेले ट्रेंड ब्लॉक करावेत व ट्रेंड मध्ये सामील झालेल्यांचे अकाऊंट बंद करण्यात यावेत अशी माझी ट्वीटर कडे मागणी आहे.'' असं ट्वीट करत त्यांनी नथुराम गोडसे संबंधीत ट्रेंड्स आणि अकाऊंट्स ब्लॉक करावे अशी मागणी त्यांनी ट्विटरकडे केली आहे.

त्याचप्रमाणे गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनीदेखील याला आक्षेप नोंदवत ''गांधींच्या मारेकऱ्यांच्या बाजूने पोस्ट करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करा. गोडसेच्या बाजूने ट्वीट करणाऱ्यांविरोधात अशा कोणत्याही भयंकर ट्रेंडवर ताबडतोब बंदी, खाती ब्लॉक आणि एफआयआर दाखल करा अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

त्याचप्रमाणे लेखक सबा नक्वी यांनी याबाबत लिहीलं की, ''नथुराम गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत असल्याने, खुनाचा गौरव करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन आयटी नियम लागू होतील का?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच पत्रकार राणा अय्युब यांनीदेखील ''जर 'नथुराम गोडसे जिंदाबाद' भारतात ट्रेंड करत असेल तर संबंधित प्रश्न विचारला जाईल. भारतीय हिंदू कट्टरपंथी कोण आहे?'' असा सवाल उपस्थित केला आहे.

ट्विटरवर आज गांधीजींबाबत आक्षेपार्ह मजकूर पसरवला जात आहे. फोटो एडिट करुन फेक पोस्ट, फेक न्यूज आणि मीम्स शेयर केले जात आहेत. यामुळे गांधीप्रेमींचं मन दुखावलं गेलं असून त्यांनी याबाबत आक्षेप घेत ट्र्रेंड बंद करण्याची आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT