massive asteroid nine times bigger than Qutub Minar is heading towards Earth saamtv
देश विदेश

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Giant Asteroid Heading Towards Earth: पृथ्वीच्या दिशेनं एक महाकाय लघुग्रह येतोय. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार का? या लघुग्रहाबद्दल नासानं काय इशारा दिलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

अवकाशातून पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या एका महाकाय लघुग्रहानं अनेकांची चिंता वाढवलीय. कुतुबमिनारच्या 9 पट मोठा असणारा हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा नासानं दिलाय. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास काय होणार? या लघुग्रहामुळं पृथ्वीवरील मानवी वस्तीचं काय होणार याबद्दल वैज्ञानिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याआधी नेमका हा लघुग्रह काय आहे ते जाणून घेऊया.

पृथ्वीच्या दिशेनं सरकतोय महाकाय ग्रह?

असं पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या महाकाय ग्रहाचं नाव

लघुग्रह 51 हजार किलोमीटर प्रति तास वेगाने पृथ्वीच्या दिशेने

नासाची 'जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी' कडून VO5 निरीक्षण

लघुग्रहाचा व्यास 660 मीटर

11 जुलैला लघुग्रह पृथ्वीजवळ येण्याची शक्यता

हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही 1988 मध्येही हा ग्रह पृथ्वीजवळून गेलाय. हा लघुग्रह पृथ्वीपासून दूर अंतरावर असल्यानं सध्यातरी त्याच्यापासून धोका नसल्याचं सांगितलं जातयं. मात्र जर इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तो किती विनाश घडवून आणेल याची कल्पना न केलेलीच बरी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT