Life Beyond Earth: 7305 दिवस ग्रहांचा अभ्यास करत शोधलं नवं जग? पृथ्वीबाहेर जीवन जगणं शक्य आहे?

Life Beyond Earth: खगोलशास्त्रज्ञ अंतराळ दुर्बिणींसाठी योजना आणि तंत्रज्ञान विकसित करतायत आहेत. नासा त्यांच्या प्रस्तावित हॅबिटेबल वर्ल्ड्स वेधशाळेवर काम करतेय. यामुळे पृथ्वीबाहेर जीवन जगणं शक्य आहे की नाही हे समजू शकणार आहे.
Life Beyond Earth
Life Beyond Earthsaam tv
Published On

पृथ्वीच्या बाहेर जीवनाचा शोध घेणं हे आजच्या ग्रह विज्ञानाचे एक प्रमुख ध्येय आहे. अमेरिका या दिशेने अनेक गोष्टी देखील करताना दिसतंय. परंतु जर आपल्याला एखाद्या ग्रहावर जीवनाचं कोणतंही चिन्ह आढळलं ज्याला बायोसिग्नेचर म्हणतात तर ते योग्यरित्या समजून घेणं सोपं होणार नाही.

खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलजीवशास्त्रज्ञ गेल्या २० वर्षांपासून सौरमालेच्या बाहेरील ग्रहांचा अभ्यास करतायत. अशातच त्यांनी एक नवीन पद्धत विकसित केलीये. ज्याद्वारे आपण कोणते ग्रह किंवा चंद्र जीवनासाठी सर्वात योग्य असू शकतात किंवा नाही हे समजू शकतो. ही पद्धत पृथ्वीवरील जीवनाच्या मर्यादांच्या अभ्यासावर आधारित आहे.

Life Beyond Earth
Shadashtak Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार पॉवरफुल षडाष्टक योग, 'या' राशींना मिळू शकणार पैसा; नव्या नोकरीचेही संकेत

जीवाचा शोध घेण्यासाठी नवीन दुर्बिणी

खगोलशास्त्रज्ञ एक शक्तिशाली अंतराळ दुर्बिण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहेत. नासा त्यांच्या प्रस्तावित हॅबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्व्हेटरीवर काम करत आहे, जी अल्ट्राशार्प फोटो घेईल ज्यामुळे जवळच्या ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह थेट दिसून येणार आहे. आणखी एका कॉन्सेप्ट नॉटिलस स्पेस टेलिस्कोप नक्षत्राचा समावेश आहे. जो शेकडो संभाव्य पृथ्वीसारख्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

एप्रिल २०२५ मध्ये जाहीर झालेल्या K2-18b या बाह्यग्रहावर जीवनाच्या संभाव्य संकेतांबद्दल अत्यंत वादग्रस्त दावे करण्यात आले होते. तर रिमोट सेन्सिंग डेटावरून जीवनाची उपस्थिती निश्चितपणे शोधणं किती कठीण आहे हे सांगितलं जातं.

Life Beyond Earth
Navpancham Rajyog: ३० वर्षांनंतर बनतोय पॉवरफुल नवपंचम राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार नवी नोकरी अन् पैसा

पृथ्वीच्या पलीकडे जीवनाचा शोध

परग्रही जग राहण्यायोग्य असू शकते का? म्हणजेच अशी जागा जिथे जीवन जगू शकता येईल. पण परग्रही जीवनासाठी कोणत्या परिस्थिती योग्य असतील? हा प्रश्न समोर येतो. आतापर्यंत नासाचं साधं तत्व असं आहे की 'जिथे पाणी आहे, तिथे जीवनाची शक्यता आहे.' कारण पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व जीवांना पाण्याची आवश्यकता असते. परंतु शास्त्रज्ञांनी इतर प्लँक्टनचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवात केला आहे.

सध्या, नासाच्या 'एलियन अर्थ्स' प्रोजेक्टनुसार, अनेक शास्त्रज्ञ यावर काम करतायत. जगभरातील तज्ज्ञांच्या सहकार्याने एक नवीन पद्धत विकसित करण्यात आलीये. 'क्वांटिटेटिव्ह हॅबिटिबिलिटी फ्रेमवर्क' याचा उद्देश अंतराळात किंवा चंद्रावर आढळणाऱ्या परिस्थिती कोणत्याही विशेष प्राण्यांसाठी किंवा सजीव व्यवस्थेसाठी योग्य आहेत की नाही हे समजून घेणं आहे.

Life Beyond Earth
Early Cancer Detection Formula: आता ३ वर्षाआधीच कळणार कॅन्सर होणार की नाही! रिसर्चर्सने शोधला नवा फॉर्म्युला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com