Eknath Shinde, Shrikant Shinde, cabinet expansion Saam TV Marathi
देश विदेश

Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळात फेरबदल! बड्या नेत्यांचा पत्ता कट? श्रीकांत शिंदे, संजय पाटलांना लॉटरी; पाहा यादी

Union Cabinet Reshuffle : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या चेहऱ्यांना संधी, महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदल आणि महाराष्ट्रातील नेत्यांना मंत्रीपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Modi Government Cabinet Expansion update: राजधानी दिल्लीत नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या सर्व अंतर्गत चर्चा आणि विचारमंथन पूर्ण झाले आहे. या फेरबदलाबाबतची (Narendra Modi cabinet reshuffle latest update) सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, कधीही याची औपचारिक किंवा अधिकृत घोषणा होऊ शकते. दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही जाहीर होऊ शकतो. (Union Government Cabinet Expansion)

भाजपने सर्व मित्रपक्षांसोबत या विस्ताराबाबतची चर्चा आणि सल्लामसलत पूर्ण केली आहे. या आगामी फेरबदलामध्ये अनेक नव्या आणि तरुण चेहऱ्यांना मोदी मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या फेरबदलात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, तसेच 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत आलेल्या काही नव्या खासदारांना मंत्रीपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या दोन कार्यकाळातही २ वर्षांनी जुलै महिन्यातच मंत्रिमंडळात फेरबदल झाले होते. तिसऱ्या कार्यकाळतही फेरबदल होणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याशिवाय विनोद तावडे, नितीश कुमार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशसह प्रमुख राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आपली राजकीय रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. रविवारी अथवा सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर शिक्कामोर्तब होण्याची आहे. केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या खातेबदलांची चर्चा सुरू आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थ खात्याचा कारभार काढून घेतला जाईल, असे म्हटले जातेय. तर धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांचा पत्ता कट होऊ शकतो. तसेच शक्तिकांत दास, अनुराग ठाकूर, श्रीकांत शिंदे आणि अरुण गोविल यांसारख्या नवीन चेहऱ्यांचा संभाव्य समावेश होण्याची शक्यता आहे. राघव चड्ढा किंवा अशोक मित्तल या दोघांपैकी एकाला कॅबिनेटमध्ये एक जागा मिळू शकते. मिळालेल्या वृत्तानुसार, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून आरोग्य खाते जाण्याची शक्यता असून, आयुष खाते कायम ठेवले जाईल. आरोग्य खाते संजय दीना पाटील यांना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT