Entrepreneur Namita Thapar reacts strongly after facing severe online trolling over her viral video on namaz benefits. saam tv
देश विदेश

सोशल मीडियावर नालायकांची झूंड, उद्योजिका नमिता थापर यांना शिव्यांची लाखोली

सोशल मीडियावर ट्रोल करणारी नालायकांच्या झुंडीचा आणखी एक कारनामा समोर आलाय.. पुण्याच्या उद्योजिका नमिता थापर यांना किती खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करण्यात आलंय.. आणि त्यावर नमिता थापर यांनी काय उत्तर दिलंय.

Bharat Mohalkar

या आहेत उद्योजिका नमिता थापर.... डोक्यात संतापाची तिडीक जावी... संवेदनशील माणसाची मान शरमेनं झुकावी, अशा शब्दात सोशल मीडियावरची नालायकांची झूंड नमिता थापर यांच्यावर तुटून पडलीय.... होय.. अक्षरशः तुटून पडलीय.. फक्त नमिता थापर यांनाच नाही तर त्यांच्या वृध्द आईलाही शिवागाळ कऱण्यात आलीय... मात्र तब्बल 25 दिवसांनी नमिता थापर यांनी मौन सोडत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय...

खरं तर या ट्रोल धाडीला कारण ठरलंय नमिता थापर यांनी रमजानच्या महिन्यात नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगणारा बनवलेला व्हिडीओ.... आणि हाच व्हिडीओ सोशल मीडियावरच्या धर्माच्या ठेकेदारांना झोंबला... आणि ही ट्रोल धाड नमिता थापर यांना ट्रोल करायला लागली...

फक्त नमिता थापरच नाही तर सामाजिक, राजकीय, मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील महिलांना अत्यंत अश्लील शब्दात ट्रोल केलं जातं...महिलांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या... अभद्र भाषेत महिलांवर टिपण्णी करुन सोशल मीडियावर नालायकपणाचा कळस गाठणाऱ्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे... नाहीतर या ट्रोलधाडीनं अख्ख्या समाजाचं मोठं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT