dead body SaamTv
देश विदेश

गोव्यातील कळंगुट किनारी तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

दक्षिण गोव्यातील बाणावली येथील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच उत्तर गोव्यातील नास्नोळा-हळदोणा येथील तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह कळंगुट समुद्र किनारी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

अनिल पाटील

गोवा : दक्षिण गोव्यातील बाणावली येथील बलात्कार प्रकरण ताजे असतांनाच उत्तर गोव्यातील नास्नोळा-हळदोणा येथील सिद्धी संदीप नाईक या तरुणीचा नग्नावस्थेतील  मृतदेह कळंगुट  समुद्र किनारी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

कळंगुट पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय पाठवून दिला आहे. दरम्यान सिद्धी नाईकचा अज्ञाताकडून बलात्कार करून खुन झाल्याचा संशय स्थानिक पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नास्नोळा गावात राहाणाऱ्या नाईक कुटुंबात एकुण चौघा भावंडांपैकी सिद्धी घरात सर्वात मोठी होती. मयडेतील सेंट झेवियर हायस्कूल मधून तिचे  दहावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. 

हे देखील पहा -

सध्या ती पर्वरीतील एका नामांकित खाजगी मॉलमध्ये कामाला होती. बुधवारी सकाळी पर्वरीत  कामावर गेलेली सिध्दी नाईक रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे घरच्यांनी म्हापसा पोलिसांत तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली होती. दरम्यान गुरुवारी कळंगुटच्या समुद्र किनारी सिद्धीचा नग्नावस्थेतील मृतदेह स्थानिक लोकांना दिसल्याने तात्काळ कळंगुट पोलिसांना स्थांनिकांकडून  कळविण्यात आले.

कळंगुटच्या पोलीस उप-निरीक्षक प्रगती नाईक यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठवून दिला आहे. पुढील तपास निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

SCROLL FOR NEXT