Nagaland Toxic Liquor Tragedy 19 Dead, 19 Arrested AI Image
देश विदेश

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

Nagaland Liquor Tragedy News : नागालँडमध्ये भेसळयुक्त आणि विषारी दारू प्यायल्याच्या संशयातून दोन दिवसांत १९ जणांचा मृत्यू. १९ जणांना अटक, ३ हजार दारूच्या बाटल्या जप्त; SIT आणि फॉरेन्सिक तपास सुरू.

Alisha Khedekar

  • नागालँडमध्ये संशयित विषारी दारूमुळे दोन दिवसांत १९ जणांचा मृत्यू

  • मोकोकचुंगमध्ये ८ आणि तुएनसांगमध्ये ११ मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती

  • तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली असून १९ जणांना अटक करण्यात आली

पुण्यात काही महिन्यांपूर्वी विषारी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू झाला. अशीच एक धक्कादायक घटना नागालँडमधून समोर आली आहे. भेसळयुक्त आणि विषारी दारू प्यायल्याने गेल्या दोन दिवसांत किमान १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संबंधित भागात खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या मृत्यूच्या घटना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडल्या आहेत. मोकोकचुंग जिल्ह्यात ८ तर तुएनसांग जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व मृत्यू बेकायदेशीर आणि भेसळयुक्त दारूच्या सेवनाशी असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) वेसुप्रा केजो यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) आय. बुंगलांग चांग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) स्थापन करण्यात आली आहे. हे पथक भेसळयुक्त दारूचा स्रोत तसेच त्याची पुरवठा साखळी शोधण्याचे काम करत आहे.

मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी दारूचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी गुवाहाटी येथे पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित ठिकाणी छापेमारी करत १९ जणांना अटक केली असून सुमारे ३००० दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

नागालँडमध्ये १९९० पासून दारूबंदी लागू आहे. असे असतानाही बेकायदेशीर दारूचा पुरवठा आणि विक्री सुरू असल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी, लेबल नसलेली किंवा बेकायदेशीर असल्याचा संशय असलेली दारू सेवन न करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरीत ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, वाहतुकीचा मोठा खोळंबा

Walking Loss Calories: रोज फक्त २० मिनिटं चालण्याने किती कॅलरी बर्न होतात? वजन कमी करणाऱ्यांनी जाणून घ्या!

Moringa Leaves : शेवग्याची पाने रोज खाल्ल्याने काय होते? फायदे वाचून व्हाल थक्क, बनवा 'या' ७ खास रेसिपीज

Driverless Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; मार्ग आणि स्थानके कोणती?

India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

SCROLL FOR NEXT