नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचं आज शुक्रवारी ८० व्या वर्षी निधन झालं. एल. गणेशन हे त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी पडल्याने डोक्याला लागून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर चेन्नईच्या अपोलो रुग्णलयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
ला गणेशन अय्यर असं पूर्ण राज्यापालांचं नाव आहे. गणेशन यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला होता. गणेशन यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी नागालँडच्या १९ वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी २७ ऑगस्ट २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मणिपूरचे १७ वे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला होता. तसेच २८ जुलै २०२२ ते १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पश्चिम बंगालचे (अतिरिक्त प्रभार) म्हणून जबाबदारी पार पडली.
एल. गणेशन हे मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार देखील राहिले होते. गणेशन हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अनुभवी नेते होते. गणेशन यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९४५ रोजी तामिळनाडूच्या इलाकुमिकवन येथे झाला होता. गणेशन यांचा तामिळ ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता. गणेशन यांच्या वडिलांचं अकाली निधन झालं होतं.
वडिलांच्या निधनानंतर गणेशन यांचा त्यांचा भावाने सांभाळ केला. त्यांनी शिक्षणावर भर दिला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले होते. आजीवन अविवाहित राहिलेले गणेशन हे नोकरी सोडून पूर्णवेळ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते झाले होते.
गणेशन चेन्नईतील के टी नगर येथील निवासस्थानी घसरून पडले होते. एल. गणेशन घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून गणेशन यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज गणेशन यांनी रुग्णालयात अखेर श्वास घेतला. गणेशन यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.